येमेनच्या हौथी बंडखोरांच्या सौदी अरेबियासोबतच्या वाढत्या वैरामुळे या देशाचे मोठे नुकसान होत आहे. बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या ड्रोनने अनेक सौदी शहरांवर हल्ले केले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्यात अरामको रिफायनरी, जेद्दाहमधील किंग अब्दुल्ला विमानतळ आणि आभा विमानतळाचा समावेश आहे. या हल्ल्यासाठी एकूण 14 ड्रोन वापरण्यात आले, असे हौथी सशस्त्र दलाचे प्रवक्ते याह्या सारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. Yemen iran backed houthi rebels claims to attack saudi arabia cities through bomb loaded drones
वृत्तसंस्था
दुबई : येमेनच्या हौथी बंडखोरांच्या सौदी अरेबियासोबतच्या वाढत्या वैरामुळे या देशाचे मोठे नुकसान होत आहे. बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या ड्रोनने अनेक सौदी शहरांवर हल्ले केले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्यात अरामको रिफायनरी, जेद्दाहमधील किंग अब्दुल्ला विमानतळ आणि आभा विमानतळाचा समावेश आहे. या हल्ल्यासाठी एकूण 14 ड्रोन वापरण्यात आले, असे हौथी सशस्त्र दलाचे प्रवक्ते याह्या सारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
प्रवक्त्याने सांगितले की, तेल शुद्धीकरण केंद्रांवर बॉम्बने भरलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. यासोबतच आभा, जिझैन आणि नजरान या शहरांवरही हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे झालेल्या एकूण नुकसानीबाबत सारी यांनी काहीही सांगितलेले नाही. हौथी प्रवक्त्याने सांगितले की सौदी अरेबियाचे युती सैन्य येमेनमधील हौथींवर हवाई हल्ले करत आहेत, त्यांना प्रत्युत्तर म्हणून तेथील अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले. सौदी अरामको, सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्रालय आणि माहिती मंत्रालयाने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
युती सैन्याने बंडखोरांचे तळ नष्ट केले
दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या युती सैन्याने सांगितले आहे की त्यांनी साना, मारिब आणि सादा (येमेनचे शहर) येथील हुथी बंडखोरांचे 13 लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये ड्रोनसाठी वापरल्या जाणार्या शस्त्रास्त्रांचे डेपो, तसेच हवाई संरक्षण यंत्रणा आणि संपर्क यंत्रणा यांचा समावेश आहे. सामरिकदृष्ट्या तेलाने समृद्ध असलेल्या मेरीब प्रांतावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी हौथी गट फेब्रुवारीपासून येथे हल्ले करत आहे. उत्तर येमेनमधील हे ठिकाण संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या सरकारचा शेवटचा मुख्य गड आहे. सौदी येमेनी सरकारला पाठिंबा देत असल्याने इराण समर्थित हुथी संघटना नियमितपणे रॉकेट आणि ड्रोनसह सौदी अरेबियावर हल्ले करते.
Yemen iran backed houthi rebels claims to attack saudi arabia cities through bomb loaded drones
महत्त्वाच्या बातम्या
- युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट
- पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरची इमारतीवरून उडी मारून लाईव्ह आत्महत्या; घटनेमुळे उडाली खळबळ
- इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले…..
- रक्तातच देशसेवा, पती दहशतवादी हल्यात शहीद झाल्यावर पत्नी झाली लष्करी अधिकारी, दोन मुलांची आई
- हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन