Yashpal Sharma Death : 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 66 वर्षीय यशपाल शर्मा यांनी टीम इंडियाचे निवडकर्ते म्हणूनही काम पाहिले होते. यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात यशपाल शर्मा यांनी इंग्लंडविरुद्धच्या संघातील सर्वाधिक धावा केल्याने भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. Yashpal sharma Death Know About 1983 World Cup Winner Team Member Yashpal Sharma Profile
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 66 वर्षीय यशपाल शर्मा यांनी टीम इंडियाचे निवडकर्ते म्हणूनही काम पाहिले होते. यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात यशपाल शर्मा यांनी इंग्लंडविरुद्धच्या संघातील सर्वाधिक धावा केल्याने भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
एक क्रिकेटपटू म्हणूनच नव्हे, तर प्रशिक्षक आणि निवडकर्ता म्हणूनही त्यांचे योगदान खूप खास राहिले आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंग यांच्या कारकीर्दीतील प्रगतीचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. शुभमन गिल आणि मनदीप सिंग यासारख्या अनेक प्रतिभावान खेळाडूंचा खेळ सुधारण्याचे श्रेय यशपाल शर्मा यांना जाते. त्यांनी उत्तर प्रदेश संघाच्या प्रशिक्षकाचीही भूमिका निभावली.
इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण
उजव्या हाताचे फलंदाज यशपाल शर्मा यांनी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातून क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 33.45 च्या सरासरीने 1606 धावा केल्या. यात दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत त्यांची सर्वाधिक धावा 140 होती.
यशपाल शर्मा यांनी पाकिस्तानविरुद्ध सियालकोट येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. एकदिवसीय सामन्यात त्यांनी 42 सामन्यांत 40 डावांमध्ये 883 धावा केल्या आहेत. चार अर्धशतकांसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांची सर्वाधिक धावसंख्या 89 धावा होती. 1985 मध्ये आपल्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारे यशपाल शर्मा सात वर्षांच्या कालावधीत कधीही शून्यावर बाद झाले नव्हते. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
Yashpal sharma Death Know About 1983 World Cup Winner Team Member Yashpal Sharma Profile
महत्त्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : मराठी माणसाकडून इलेक्ट्रिक कारची निर्मिती, कांबळे बंधूंची स्वदेशी डेक्स्टो कार लवकरच धावणार रस्त्यावर
- नाना पटोले राज्यातील अतिमहत्त्वाचे नेते, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये, संजय राऊतांचा सल्ला
- पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत बैठक, कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर काय निर्णय घेणार?
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे घुमजाव, म्हणाले – ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, माझा आरोप राज्य नव्हे, तर केंद्र सरकारवर!
- नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, व्यवस्थापन हादरले, तपास सुरू