• Download App
    YAAS Cyclone : पीएम मोदींकडून बंगाल आणि ओडिशासाठी 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर । YAAS Cyclone pm modi announces rs 1000 crore for states affected by the cyclone

    YAAS Cyclone : पीएम मोदींकडून बंगाल आणि ओडिशासाठी 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर

    YAAS Cyclone : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मदत पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार ओडिशाला तातडीने 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पश्चिम बंगाल आणि झारखंडसह उर्वरित 500 कोटी रुपये नुकसानीच्या हिशेबाने देण्यात येतील. YAAS Cyclone pm modi announces rs 1000 crore for states affected by the cyclone


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मदत पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार ओडिशाला तातडीने 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पश्चिम बंगाल आणि झारखंडसह उर्वरित 500 कोटी रुपये नुकसानीच्या हिशेबाने देण्यात येतील.

    पंतप्रधान कार्यालयाने म्हटले की, केंद्रीय पथक नुकसानीचे आकलन करण्यासाठी राज्यांची भेट घेईल. त्यांच्या मूल्यांकनाच्या आधारे पुढील मदत दिली जाईल. पंतप्रधानांनी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड यांना आश्वासन दिले की, या कठीण काळात केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करेल. चक्रीवादळामुळे प्राण गमवावे लागलेल्या कुटुंबाला पीएम मोदी यांनी 2 लाख आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली.

    पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम भुवनेश्वरला भेट दिली. तेथे त्यांनी आढावा बैठक घेतली. ओडिशाचे मुख्यमंत्री यांच्याव्यतिरिक्त राज्यपाल गणेशी लाल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, प्रताप सारंगी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

    त्यानंतर पंतप्रधान बालासोर व भद्रक या बाधित भागाच्या हवाई पाहणीसाठी रवाना झाले. येथून पश्चिम बंगालला येऊन आढावा बैठक घेतली. सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हिंगलगंज आणि सागर येथे आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान मोदींना कालैकुंडा येथे भेटले आणि त्यांना पश्चिम बंगालमधील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. नुकसानीचा अहवाल मी त्यांना दिला. आता मी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दिघा येथे जात आहे.

    YAAS Cyclone pm modi announces rs 1000 crore for states affected by the cyclone

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य