वृत्तसंस्था
सॅन फ्रान्सिस्को : सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को!!, अशी उर्दू कहावत आहे. ही कहावत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या वक्तव्यातून अमेरिकेत “सिद्ध” केली. चीनचा दुसऱ्या कुठल्याही देशाच्या एकाही इंच जमिनीवर ताबा नाही, असा दावा त्यांनी केला. xi jinping china says
भारताची तब्बल 54000 स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनने बळकावली आहे. चीनच्या फाईव्ह फिंगर्स धोरणानुसार भारताच्या हक्काचा प्रदेश अरुणाचलवर चीन दावा सांगतो आहे आणि तरी देखील चीनचा दुसऱ्या कुठल्याही देशाच्या एकाही इंच जमिनीवर ताबा नाही, असा दावा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला आहे. हाच “सौ चूहे खाकर दिल्ली चली हज को” हा प्रकार आहे!!
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर त्यांचे तैवान विषयावर सिक्रेट डील झाल्याचे बोलले जाते. यातून भारताला राजनैतिक पातळीवरचा इशारा मिळाला आहे.
या दौऱ्यातच शी जिनपिंग APEC आशिया पॅसिफिक इकॉनोमिक को ऑपरेशन शिखर परिषदेत उपस्थित राहिले तेथे त्यांनी जे भाषण केले त्या भाषणातूनच त्यांनी चीनचा दुसऱ्या कोणत्याही देशाच्या एकाही इंच जमिनीवर ताबा नाही असा दावा केला त्याचबरोबर आजपर्यंत चीनमुळे कधीही युद्ध सुरू झालेले नाही, असाही दावा केला वास्तविक पाहता 1962 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशात तवांग परिसरात आक्रमण करून पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा विश्वासघात केला आणि अरुणाचल प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चीनने लढा परिसरातील तब्बल 54000 स्क्वेअर किलोमीटरची जमीन भारतीय भूमी गिळंकृत केली. तरी देखील चीनमुळे कोणतेही युद्ध सुरू झाले नसल्याचा दावा शी जिनपिंग यांनी केला.
यादरम्यान त्यांनी अमेरिका-चीन बिझनेस कौन्सिलच्या डिनरमध्ये ही माहिती दिली. जिनपिंग पुढे म्हणाले, चीन विकासाच्या कोणत्याही स्तरावर पोहोचला तरी आम्ही कुठेही कब्जा करण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही आमची इच्छा इतरांवर कधीही लादणार नाही. चीनला आपला प्रभाव वाढवायचा नाही आणि आम्ही कोणाशीही युद्ध करणार नाही.
अमेरिका-चीन संबंधांबद्दल बोलताना शी म्हणाले, जगाला चीन आणि अमेरिकेने एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्हाला धोका म्हणून पाहिले जाऊ नये. स्वतःच्या फायद्यासाठी आणि चीनच्या नुकसानासाठी काम करणं चुकीचं आहे. जगात कितीही बदल झाले तरी अमेरिका आणि चीनमधील शांततापूर्ण संबंध कधीही बदलणार नाहीत, अशी ग्वाही जिनपिंग यांनी देण्याचा प्रयत्न केला.
भारताशी सीमा तंटा
2020 मधील गलवान संघर्षानंतर, चीन एलएसीवरील सद्यस्थिती बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहे. ते LAC च्या या बाजूच्या भारताचा भाग स्वतःचा असल्याचा दावा करते. दोन्ही बाजूंनी पेट्रोलिंग पॉईंट 15 वर सैन्याची तैनाती वाढवली आहे, जे गलवान चकमकीचे केंद्र होते. 2020 पासून, LAC जवळ शस्त्रांसह सुमारे 50000 भारतीय सैनिक तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून चीनने भारतीय भूमीवर कब्जा करू नये.
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर हा नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यात चीनने भारताचा काही भाग आपला भाग दाखवला होता.
या वर्षी 28 ऑगस्ट रोजी चीनने आपल्या अधिकृत नकाशात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण-चीन समुद्राला आपला प्रदेश म्हणून घोषित केले होते. यापूर्वी, एप्रिल 2023 मध्ये चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली होती.
चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा असे केले आहे. याआधी चीनने 2021 मध्ये 15 आणि 2017 मध्ये 6 ठिकाणांची नावे बदलली होती. याशिवाय चीनचे फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशांशी तैवान आणि दक्षिण चीन समुद्राबाबतही वाद आहेत.
xi jinping china says
महत्वाच्या बातम्या
- मराठा नेत्यांचा लढा जरांगेंच्या आडून; पण प्रस्थापित ओबीसी नेते लढत आहेत पुढून!!
- मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद, प्रकरणाची सुनावणी पूर्ण; शाही ईदगाहच्या सर्वेक्षणासह सर्व १६ याचिकांवरील निर्णय राखीव
- Air India : एअर इंडियाच्या ३७ वर्षीय वैमानिकाचा दिल्ली विमानतळावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- भाऊबीजेनिमित्त प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट!