• Download App
    कोरोनाचा फटका बसलेला जागतिक व्यापार चालू वर्षांत मात्र वाढण्याचा अंदाज।WTO hopes increase in world trade

    कोरोनाचा फटका बसलेला जागतिक व्यापार चालू वर्षांत मात्र वाढण्याचा अंदाज

    वृत्तसंस्था

    फ्रँकफर्ट : कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात जागतिक व्यापाराला मोठा फटका बसल्यानंतर चालू वर्षांत व्यापारात पुन्हा वाढ होण्याची शक्यता जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली आहे.
    गेल्या वर्षी जागतिक व्यापार ५.३ टक्क्यांनी घटला होता. WTO hopes increase in world trade

    चालू वर्षांत त्यात ८ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ‘डब्लूटीओ’ला आहे. त्यापुढील वर्षांत वाढीचा वेग ४ टक्क्यांनी पुन्हा कमी होऊ शकतो. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात जगातील बहुतेक व्यवहार बंद पडल्याने व्यापारात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.



    मात्र, अनेक देशांनी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी प्रचंड पैसा ओतल्याने घट अपेक्षेपेक्षा कमी झाली. आता व्यापाराला वेग आल्याने त्यात वाढ होण्याचा अंदाज ‘डब्लूटीओ’ने व्यक्त केला आहे. मात्र, लसीकरणात शिथिलता, प्रादेशिक वाद आणि कमजोर झालेले सेवा क्षेत्र यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

     

    संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी लशीच्या रुपाने चांगली संधी जगासमोर आली आहे. मात्र, लस वितरणाच्या बाबतीत गरीब आणि श्रीमंत देशांमध्ये तफावत असून हा भेद दूर करेपर्यंत धोका कायम राहणार असल्याचे ‘डब्लूटीओ’ने म्हटले आहे.

    WTO hopes increase in world trade

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!