वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रज भूषण सिंह यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप लावणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया हे नोकरीवर परतले आहेत. या तिघांनीही रेल्वे मधले आपले ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी हे काम पुन्हा सुरू केले आहे. पण आपले अन्यायाविरुद्धचे आंदोलन रेल्वेतील कर्तव्य बजावत असताना देखील सुरूच राहील, असे ट्विट साक्षी मलिक हिने केले आहे. Wrestlers Sakshi Malik, Vinesh Phogat and Bajrang Punia resume work in Railways
कुस्तीगीर आंदोलनातील साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या प्रमुख कुस्तीगिरांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली होती. त्याआधी भाजप खासदार ब्रज भूषण सिंह यांच्या विरुद्ध विशिष्ट कारवाई करणार, अशा बातम्या आल्या होत्या. दरम्यानच्या काळात ब्रज भूषण सिंह यांच्या विरुद्ध कुस्तीगिरांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये नेमकी कोणती कलमे लावली आहेत त्यातून त्यांच्याविरुद्ध कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ शकते?, याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. परंतु कोणीही कुस्तीगीर अधिकृतपणे कोर्टासमोर तशी साक्ष द्यायला तयार झाल्या नव्हत्या.
अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मात्र कुस्तीगीरांच्या आंदोलनातील पावले मागे पडायला सुरुवात झाली. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आपापल्या नोकरीवर परतले. या संदर्भातल्या बातम्या माध्यमांनी दिल्यानंतर साक्षी मलिकने एक ट्विट केले. त्यात तिने रेल्वेतील कर्तव्य बजावत असनाही आपण आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
Wrestlers Sakshi Malik, Vinesh Phogat and Bajrang Punia resume work in Railways
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा