Tokyo Olympic : क्रीडाविश्वासाठी आनंदाची बातमी आली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना तिकिटे मिळाली आहेत. अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही कुस्तीपटू 62 किलो गटांत खेळतात. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही पहिलवानांचे अभिनंदन केले आहे. wrestlers anshu malik and sonam From haryana qualified for tokyo olympic
विशेष प्रतिनिधी
सोनिपत : क्रीडाविश्वासाठी आनंदाची बातमी आली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना तिकिटे मिळाली आहेत. अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंशु मलिक 57 किलो व सोनम मलिक 62 किलो गटात खेळत आहेत. सोनम ही सोनिपतची, तर अंशु मलिक जिंदची रहिवासी आहे. त्याचवेळी कुस्तीपटू साक्षी मलिकला मात्र पात्रत फेरित चमक न दाखवता आल्याने धक्का बसला आहे. दोन्ही कुस्तीपटू 62 किलो गटांत खेळतात. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही पहिलवानांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर कुस्तीपटू विनेश फोगाटनेही या दोघींची अभिनंदन केले आहे.
निदानी गावची 19 वर्षीय महिला कुस्तीपटू अंशु मलिक हिने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तीन कुस्तीपटूंचा पराभव केला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेलग्रेड येथे झालेल्या कुस्ती विश्वचषक स्पर्धेत अंशुने देशासाठी रौप्यपदक जिंकले होते. विश्व चषक स्पर्धेत चांगली तयारी केल्यानंतर व आताच्या पात्रता फेरीत प्रवेशानंतर अंशु मलिक आनंदात आहे.
दरम्यान, यावर्षी जानेवारीमध्ये आग्राच्या लडामदा गावात झालेल्या महादंगलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या कुस्तीपटू साक्षी मलिकचा अंतिम फेरीत कुस्तीपटू सोनमने पराभव केला. पराभूत झाल्यावर साक्षीच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकचा पराभव केल्यानंतर विजयी कुस्तीपटू सोनम म्हणाली की, हा क्षण तिच्यासाठी खूप आनंदाचा आहेत. सोनमने सांगितले की, तिने साक्षी मलिकला ट्रायलमध्येही पराभूत केले आहे. तिने आपल्या विजयाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षकांना दिले.
wrestlers anshu malik and sonam From haryana qualified for tokyo olympic
महत्त्वाच्या बातम्या
- CBSE वर प्रियांका गांधींचा संताप, म्हणाल्या – कोरोना काळात मुलांना परीक्षेच्या सक्तीसाठी हे बोर्ड जबाबदार!
- उत्तराखंडचा मोठा निर्णय, बद्रीनाथसह 51 मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त; विहिंपने म्हटले – इतर राज्यांनीही असे करावे अन्यथा आंदोलन
- PM मोदी म्हणाले, ‘कूचबिहारची घटना दु:खद, दीदी – तृणमूलची मनमानी चालणार नाही, दोषींना शिक्षा व्हावी’
- WATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!
- कुचबिहारमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांवर हल्ला; निवडणूक हिंसाचारात ४ ठार; निवडणूक आयोगाने रिपोर्ट मागविला; तृणमूळच्या नेत्यांचा सुरक्षा दलांवरच आरोप