देशाला दोनदा ऑलिम्पिकपद मिळवून देणारा एकमेव पहिलवान सुशील कुमार एका तरुण पहिलवानाच्या खुनावरून अटकेत आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. पण गजाआड मिळणाऱ्या रोजच्या दहा चपात्या, डाळ-भाताने पोट भरत नसल्याची तक्रार सुशील कुमारने न्यायालयात केली आहे. त्याने न्यायालयाकडे त्याने या मागण्या केल्या आहेत. Wrestler Sushil Kumar, arrested in murder of a fellow wrestler, has demanded protein supplements, exercise bands and a special diet.
प्रतिनिधी
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच ऑलिम्पिक पदक विजेता पहिलवान सुशील कुमार गजाआड बंद झाला आहे. खरे तर ही वेळ त्याची आखाड्यात घुमण्याची, भरपूर मेहनत घेण्याची आणि कसदार आहार घेण्याची. पण युवा राष्ट्रीय पहिलवान सागर धनकर याच्या खुनाच्या गंभीर आरोपावरुन सुशील कुमार तुरुंगात बंद असल्याने ना त्याला व्यायाम पुरेसा करता येतोय नाही त्याला कसदार, पौष्टिक अन्न मिळते आहे.
सागरचा खून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. त्यानंतर पळून गेलेला सुशील तीन आठवडे फरार गेला. अखेर त्याला 23 मे रोजी दिल्ली पोलिसांनी पंजाबातून अटक केली. तेव्हापासून न्यायालयीन आदेशानुसार सुशील कुमार गजाआड बंद आहे. त्यामुळेच त्याने न्यायालयाकडे अर्ज करून विशेष गोष्टींची मागणी केली आहे.
तुरुंगात सुशील कुमारला रोज पाच चपात्या, दोन भाज्या, डाळ आणि भात असा आहार दोनवेळा दिला जातो. या शिवाय दर महिन्याला सहा हजार रुपयांच्या वस्तू जेल कॅंटिनमधून खरेदी करण्याची परवानगी कैद्यांना असते.
मात्र तुरुंगात मिळणाऱ्या एवढ्या भोजनात सुशील कुमारचे पोट भरेना. भरपूर व्यायाम करुन पिळदार शरीर बनवलेल्या सुशील कुमारला आणखी अन्न हवे आहे. शिवाय टोकियो ऑलिम्पिकसाठी तो तयारी करत असल्याने तुरुंगात येण्यापुर्वी तो रोज विशिष्ट डाएट घेत होता. तोही आता बंद आहे.
त्यामुळे रोज 3 ओमेगा गोळ्या, व्यायामाआधी घेण्याचा पूरक आहार, मल्टीव्हिटॅमीन गोळ्या, प्रोटिनयुक्त आहार मला तुरुंगात मिळावा अशी मागणी सुशील कुमारने न्यायालयाकडे केली आहे. व्यायामाचेही काही साहित्य तुरुंगात मिळावे अशी त्याची मागणी आहे.
त्याच्या मागणीवर न्यायालय बुधवारी निर्णय घेणार आहे. सध्या सुशील कुमारला दिल्लीतल्या मंडलोई तुरुंगात स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. कोणाशीही भेटण्याची परवानगी त्याला नाही. खुनाच्या आरोपावरून तुरुंगात असतानाही काही आठवड्यांवर आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची आशा त्याला अजून आहे हे विशेष.
Wrestler Sushil Kumar, arrested in murder of a fellow wrestler, has demanded protein supplements, exercise bands and a special diet.
महत्त्वाच्या बातम्या
- PM मोदींना भेटेले CM उद्धव ठाकरे, कोरोना संकटासह मराठा आरक्षणावर झाली चर्चा
- खानावळीच्या आचाऱ्यांकडून घरफोड्या; पुण्यातील खळबळजनक घटना उघड
- काशी, प्रयाग, हरिद्वार आणि गया येथे पोस्ट खाते करणार अस्थी विसर्जन ; गंगाजलही मिळणार
- महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षाचा तुरुंगवास; व्यावसायिकाला ६२ लाख रुपयांना फसविले
- काश्मीरचे वायन गाव लसीकरणात अव्वल; प्रशासनच पोचले गावात; घरोघरी दिले डोस