• Download App
    वाह मंत्रीजी ! विद्यार्थीनीने केली तक्रार; चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ ; प्रद्युम्न सिंग तोमर यांचे कौतुक|Wow Minister! The student complained; Chucky cleans the toilet done by the minister; Praise to Pradyumna Singh Tomar

    वाह मंत्रीजी ! विद्यार्थीनीने केली तक्रार; चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ ; प्रद्युम्न सिंग तोमर यांचे कौतुक

    • मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांनी एका सरकारी शाळेतील शौचालय साफ करत  स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तोमर हे सतत दौऱ्यावर असतात.
    • त्यांनी आपल्या एका दौऱ्यामध्ये ग्वाल्हेरमधील एका शाळेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान शाळेतील शौचालय हे अस्वच्छ असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी लगेच ते शौचालय स्वच्छ केले.
    •  त्यानंतर त्यांनी स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशातील शिवराज सरकार मधील ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर राज्याच्या विविध विभागांना भेटी देत ​​आहेत.  त्यांनी ग्वाल्हेरमधील हजीराला भेट दिली. जिथे ते पाहणीसाठी सरकारी कन्या माध्यमिक विद्यालय हजिरा येथे पोहोचले. Wow Minister! The student complained; Chucky cleans the toilet done by the minister; Praise to Pradyumna Singh Tomar

    तपासणीदरम्यान हजिरा येथील शासकीय कन्या माध्यमिक विद्यालयात स्वच्छतागृह अस्वच्छ आढळून आले. त्यानंतर त्यांनी स्वत: झाडू आणि ब्रश घेतला आणि स्वतःच्या हातांनी स्वच्छ केला. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांना जिल्हाभरातील शाळांमधील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनाही दिल्या.



    प्रद्युम्न सिंग तोमर हे आपल्या एका दौऱ्यानिमित्त ग्वाल्हेरला आले होते. यावेळी त्यांनी ग्वाल्हेरलाच्या हजीरा  परिसरातील शासकीय कन्या माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थीनींशी संवाद साधला. यापैकीच  एका विद्यार्थीनीने शाळेचे शौचालय अस्वच्छ असल्याची तक्रार मंत्र्यांकडे केली होती.

    या तक्रारीनंतर तोमर यांनी  स्वत: हातात झाडू घेऊन हे  शौचालय साफ केले. तसेच राज्यातील सर्व शाळेतील शौचालयाची नियमीत स्वच्छता राखली जावी याबाबत देखील त्यांनी आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या या कृतीचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

    दरम्यान ऊर्ज मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांची स्वच्छता करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.  तर त्यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करताना ते अनेकदा आढळून आले आहेत. तसेच ते वेळोवेळी आपल्या कृतीमधून स्वच्छतेचा संदेश देत असतात.

    Wow Minister! The student complained; Chucky cleans the toilet done by the minister; Praise to Pradyumna Singh Tomar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली