• Download App
    गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून ९००० कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त! मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता | Worth Rs. 9000 crores heroine has been seized at mundra port in gujarat

    गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून ९००० कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त! मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    कच्छ : ३००० किलो इतके हिरोईन जप्त करण्यामध्ये डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंटला यश मिळाले आहे. गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या ड्रग्सची किंमत जवळपास ९००० करोड इतकी आहे.

    Worth Rs. 9000 crores heroine has been seized at mundra port in gujarat

    प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांची अदानी पोर्ट नावाची कंपनी आहे. मुद्रा पोर्ट अदानी कंपनीच्या मालकीचे आहे. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स आणि स्थानिक पोलीस या दोघांनी मिळून हे ऑपरेशन पार पाडले आहे. मागील काही दिवसांपासून ड्रग रॅकेट संबंधीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. दोन मोठ्या कंटेंनरमधून हे ९००० कोटी रूपयांचे हेरॉइन पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचप्रमाणे दोन व्यक्तींना देखील यासंदर्भात अटक झाली आहे. या सर्व गोष्टी मागे एक मोठे ड्रग्ज रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे.


    ATS : दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई ; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार दिल्लीत जेरबंद ; आरोपी हर्षद मेहताचा सहकारी


    ज्या कंटेनरमध्ये हे ड्रग्स सापडले आहेत, ते कंटेनर आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथून घेण्यात आले होते. हसन हुसेन या अफगाणिस्तानच्या व्यक्तीने हे दोन कंटेनर भरून ड्रग्ज भारतात पाठवल्याचा अंदाज प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    Worth Rs. 9000 crores heroine has been seized at mundra port in gujarat

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते

    Vande Mataram : वंदे मातरम् गायनादरम्यान उभे राहणे अनिवार्य होण्याची शक्यता, प्रोटोकॉल सरकारच्या विचाराधीन

    Rahul Gandhi : भाजपने म्हटले- राहुल यांनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, त्यांनी राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल मोडला