विशेष प्रतिनिधी
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज सकाळी सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश तथा नाना जाधव उपस्थित होते.
श्री समर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौरा व भिक्षा फेरी पुण्यात आली असून, त्यानिमित्त हा पूजाविधी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचेश्री रामदास स्वामी संस्थान चे अध्यक्ष आणि अधिकारी भूषण स्वामी तसेच वेदमूर्ती उपस्थित होते.
Sharad Pawar मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
समर्थ पादुका प्रचार दौरा व भिक्षा फेरी २६ डिसेंबर पर्यंत पुण्यात असणार आहे.
समर्थ रामदासस्वामी यांच्या विचार व कार्याची महती अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कर्म, उपासना ज्ञान आणि मोक्ष या चतु:सुत्रीवर आधारित कर्मनिष्ठ जीवनप्रणाली या श्रीसमर्थ विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या मुख्य हेतूने रामदास स्वामी संस्थानतर्फे दरवर्षी भिक्षा दौरा आयोजित केला जातो. समाजाच्या एकत्रीकरणासाठी उत्सव, महोत्सव साजरे करताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सहकार्यातून व सहभागातून हे साजरे व्हावेत म्हणून श्रीसमर्थांनी भिक्षेचा दंडक घालून दिला आहे. ३७७ वर्षानंतर सुद्धा याची परंपरा कायम आहे.
Worship of the Padukas of Samarth Ramdas Swami by the auspicious Dr. Mohanji Bhagwat
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
- NCP’s lust for power : सत्तेची चटक लावल्याचे बसले चटके; अजितदादांच्या फोटोला पुण्यात मारले जोडे!!
- Deepak Mankar नको ते उद्योग करू नका अन्यथा.. दीपक मानकर यांचा भुजबळ समर्थकांना दम
- धर्माचे एकत्व व्यवहारातून प्रकट व्हावे : डॉ. मोहन भागवत