वृत्तसंस्था
टोकियो : जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे जपानमध्ये निधन झाले आहे. केन तनाका, असे त्यांचे नाव आहे. त्यांचा ११९ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांना गणिताची मोठी आवड होती. World’s oldest woman dies in Japan Death at 119 years; I had a great interest in mathematics
केन तनाका यांचे १९ एप्रिलला निधन झाले. सरकारने सोमवारी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. केन तनाका यांचा जन्म २ जानेवारी १९०३ रोजी जपानच्या पश्चिम फुकूओका क्षेत्रात झाला होता. याच वर्षी राइट बंधूंनी विमानाची पहिली चाचणी घेतली होती. तर मेरी क्यूरी नोबेल जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
तनाका नर्सिंग होममध्ये राहत होत्या. तिथे त्या बोर्ड गेम्स खेळत. त्यांना गणिताचे प्रश्न सोडवण्यात विशेष रस होता. त्यांना चॉकलेट खाणेही फार आवडायचे. तरुणपणी त्यांनी विविध व्यवसाय केले. यात नूडल शॉप व राइस केक स्टोअर्सचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांचा विवाह १९२२ मध्ये हाईडिओ तनाका यांच्याशी झाला होता. त्यांना ४ मुले असून, पाचवे मूल त्यांनी दत्तक घेतले आहे.
World’s oldest woman dies in Japan Death at 119 years; I had a great interest in mathematics
महत्त्वाच्या बातम्या
- बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली; विमान कंपनीला आठ हजार भरपाईचे आदेश
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक