वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. भारतीय कुस्तीपटूंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यामुळे सदस्यत्व रद्द करण्यात आले.World Wrestling Organization’s bump, cancellation of membership of Indian Wrestling Federation, action for non-holding of elections
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 30 मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहून 45 दिवसांत (15 जुलैपर्यंत) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यास युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे सदस्यत्व निलंबित केले जाईल, असे सांगितले होते.
WFI निवडणुकीला हायकोर्टाची 28 ऑगस्टपर्यंत स्थगिती
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकांना 28 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. हरियाणा रेसलिंग असोसिएशनच्या (HWA) याचिकेवर हायकोर्टाने ही बंदी घातली आहे. 12 ऑगस्ट रोजी निवडणुका होणार होत्या. डब्ल्यूएफआय आणि हरियाणा ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असूनही त्यांच्याऐवजी अन्य एका असोसिएशनला या निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप असोसिएशनने केला होता.
दीपेंद्र हुड्डा यांच्या संघटनेने दिले होते आव्हान
HWA चे अध्यक्ष काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा आहेत. त्यांच्यावर माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
World Wrestling Organization’s bump, cancellation of membership of Indian Wrestling Federation, action for non-holding of elections
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा, ‘LAC’वरील तणाव कमी करण्यावर एकमत!
- रॉकेट्री : नंबी इफेक्ट ते द काश्मीर फाइल्स; राष्ट्रीय बाण्याच्या सिनेमांवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर!!
- चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!
- नरसिंह राव काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान; सोनियांच्या उपस्थितीत मणिशंकर अय्यरांचे आरोप बेलगाम!!