वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 17 सप्टेंबर रोजी दिवसभरात रक्तदानाचे वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे. देशभरात रक्तदानाचा आकडा 100000 युनिटच्या पार झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी स्वतः ट्विट करून ही बातमी दिली आहे.World record of blood donation on Modi’s birthday; 100000 Units Crossed!!
2021 च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी दीड कोटी युनिट रक्ताची आवश्यकता आहे. याचा अर्थ दर 2 सेकंद सेकंदात भारतात एका रुग्णाला रक्ताची गरज भासते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी 17 सप्टेंबर पासून पंधरवड्याचे रक्तदान अभियान सुरू झाले आहे. त्यातल्या पहिल्याच दिवशी 100000 युनिट रक्तदानाचा आकडा ओलांडला आहे ही वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
याआधी 6 सप्टेंबर 2014 रोजी इससे 87,059 रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केले होते. ही रक्तदान शिबिरे अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने आयोजित केली होती. त्यासाठी त्यावेळी त्यांनी भारतातल्या 300 शहरांमध्ये 556 रक्तदान शिबिरे घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यासाठी रक्तदान अमृत महोत्सवात रक्तदान करण्यासाठी आरोग्य सेतू ॲपवर इ रक्तकोष पोर्टल तयार केला असून त्यावर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. हा रक्तदान महोत्सव एक ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
मनसुख मांडविया यांनी शनिवारी सायंकाळी 7:42 बजे ट्विट केले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी 87 हजार नागरिकांनी रक्तदान केले आहे. हेच मुळात वर्ल्ड रेकॉर्ड आहे. परंतु रक्तदान अजून सुरू आहे आणि त्याची मोजणी देखील सुरू आहे. रक्तदानासाठी 1,95,925 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. रक्तदानासाठी 6136 शिबिरांना अनुमती होती. हा रक्तदान पंधरवडा सध्या सुरू असून देशभरातील विविध छोट्या मोठ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिरे होत आहेत.
World record of blood donation on Modi’s birthday; 100000 Units Crossed!!
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हरियाणा काँग्रेसमध्ये घमासान : हुड्डा आणि सुरजेवाला गट आमनेसामने
- मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांकडून समन्स, आज पुन्हा होणार चौकशी
- पाकिस्तान अन्न संकट : सव्वाशे रुपये किलो झाले पीठ, सर्वसामान्यांचे हाल, महागाईने मोडले कंबरडे
- Queen Elizabeth II Funeral: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार, ही विशेष तयारी