• Download App
    मोदींच्या नारीशक्ती वंदन कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड; एकाच वेळी 20000 ठिकाणी 85 लाख महिलांचा सहभाग!!|World Record in Modi's Nari Shakti Vandan Program; 85 lakh women participated in 20000 places at the same time!!

    मोदींच्या नारीशक्ती वंदन कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड; एकाच वेळी 20000 ठिकाणी 85 लाख महिलांचा सहभाग!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात 7 राज्यांमधल्या मेट्रोचे विस्तारीकरण होऊन त्याचे उद्घाटन तर झालेच, पण त्या पलीकडे जाऊन मोदींच्या नारीशक्ती वंदन कार्यक्रमाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केले. तब्बल 20000 ठिकाणांहून एकाच वेळी तब्बल 85 लाख महिला या नारीशक्ती वंदन कार्यक्रमात सहभागी झाल्या. भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाने या देशव्यापी कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते.World Record in Modi’s Nari Shakti Vandan Program; 85 lakh women participated in 20000 places at the same time!!

    पश्चिम बंगाल मधल्या संदेशखाली मध्ये तृणमूळ काँग्रेसच्या गुंडाने शहाजहान शेखने महिलांवर अत्याचार केले. त्यांच्या जमिनी बळकावल्या संपूर्ण संदेशखाली विभागात अत्याचाराचे पर्यायी प्रशासन चालवले. त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी संदेशखालीतल्या गरीब, दलित, पीडित, अत्याचारी महिला नारीशक्ती वंदन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.



    पश्चिम बंगाल मधल्या बरसात मध्ये मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन, महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या विद्यमान राष्ट्रीय सचिव राजस्थान सह प्रभारी विजया रहाटकर, पश्चिम बंगालमधील सर्व लोकप्रतिनिधी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते शुभेंदू अधिकारी, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार सुकांता मुजुमदार अभिनेते व्यासपीठावर उपस्थित होते.

    यावेळी मोदींनी केंद्र सरकारने नारीशक्तीसाठी केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. नव्या संसदेत कामकाजाची सुरुवातच नारीशक्ती वंदन विधेयक संमत करून झाली. त्याचबरोबर 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची योजना याच संसदेतून सुरू झाली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणारा कायदा आपल्याच सरकारच्या काळात मंजूर झाला. महिला सुरक्षेची गॅरंटी सरकारने दिली, याची आठवण मोदींनी करून दिली.

    संदेशखालीत तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी महिलांवर अत्याचार केले. त्यांच्या जमिनीवर बकावल्या. पण त्या आरोपीला सरकार तुष्टीकरणाच्या राजनीतीच्या नावाखाली पाठीशी घालत आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता सरकारच्या नेतृत्वाखाली अराजक माजले आहे. नारीशक्तीने एकत्र येऊन हे अराजक मोडून काढण्यासाठी संदेशखालीतली नारीशक्ती एकवटली. संपूर्ण देशातल्या नारीशक्तीने तिला बळ दिले, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करवून दिली.

    World Record in Modi’s Nari Shakti Vandan Program; 85 lakh women participated in 20000 places at the same time!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार