• Download App
    लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!! world cup 2023 india vs shrilanka

    world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारत आणि श्रीलंकेचे पुरते पिसले. लंकेचा डाव अवघ्या 55 धावांमध्ये कोसळला आणि टीम भारताने दिमाखात सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. world cup 2023 india vs shrilanka

    मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 357 धावांचां डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ 55 धावांवर पत्त्यासारखा कोसळला. 302 धावांच्या या ऐतिहासिक विजयासह टीम भारताने आता सेमीफायनलचं तिकीट आता पक्के केले.

    टीम भारताकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स काढल्या. मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. world cup 2023

    वानखेडे स्टेडियमवर आज मोहम्मद सिराजचे मॅजिक पहायला मिळाले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या चार ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या 4 विकेट्स गेल्या होत्या. पाथुम निसांका आणि दिमुथ करुणारत्ने या दोन्ही सलामीवीरांना खाते देखील खोलता आले नाही. बुमराहने पहिल्याच बॉलवर विकेट घेत श्रीलंकेवर प्रेशर निर्माण केलं होतं. त्यानंतर सिराजची जादू चालली. सिराजने घातक हल्लाबोल करत तीन विकेट्स उडवल्या. तर दुसऱ्या स्पेलमध्ये शमी गोलंदाजीला आला. शमीने देखील पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेत श्रीलंकेला गुघड्यावर टेकवलं. त्यानंतर फास्टर्सने कमाल केली अन् टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स, मोहम्मद सिराजने 3 विकेट्स तर बुमराह आणि जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली.

    प्रथम फलंदाजी करताना टीम भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल 92 तर विराट कोहली 88 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट आणि गिल यांनी भारताच्या डाव सावरला अन् मजबूत पाया रचला. दोघांनी शतक करता आलं नाही. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आघात केला. श्रेयस अय्यरने वादळी खेळी केली. मात्र, त्याला देखील शतक साकारता आलं नाही. अखेर जड्डूने तलवार चालवली अन् टीम भारताला 350 + चा आकडा पार करून दिला.

    world cup 2023 india vs shrilanka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका