• Download App
    जगन्नाथ पुरी मंदिर परिसरात जागतिक दर्जाचा हेरिटेज कॉरिडॉर; नवीन पटनायक यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' सुरु । World Class Heritage Corridor in Jagannath Puri Temple area; Naveen Patnaik's 'Dream Project'

    जगन्नाथ पुरी मंदिर परिसरात जागतिक दर्जाचा हेरिटेज कॉरिडॉर; नवीन पटनायक यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ सुरु

    वृत्तसंस्था

    कटक : जगन्नाथ पुरी मंदिर परिसरात जागतिक दर्जाचा हेरिटेज कॉरिडॉर साकारण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे पुरी या शहराला लवकरच एक नवीन रूप मिळेल. “जागतिक दर्जाचा” हा हेरिटेज कॉरिडॉर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर बांधला जात आहे. तो २०२४ पर्यंत तयार होईल. World Class Heritage Corridor in Jagannath Puri Temple area; Naveen Patnaik’s ‘Dream Project’

    पुरी हेरिटेज कॉरिडॉर अर्थात श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प असेही म्हटले जाते. हा पटनायक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कॉरिडॉर तयार झाल्यानंतर जगन्नाथ पुरी हे लोकप्रिय तीर्थक्षेत्र जागतिक पर्यटनाच्या नकाशावर एक विशेष स्थान मिळवेल. प्रकल्पाची एकूण किंमत ३३१.२८ कोटी रुपये आहे. जगन्नाथ मंदिराच्या ७५ मीटर शेजारील १७ एकर जागेवर हा हेरिटेज कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.



    पंतप्रधान मोदींच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरशी या प्रकल्पाची तुलना केली जात आहे. पुरी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ सदस्याने सांगितले की, हा प्रकल्प सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधांच्या बाबतीत वाराणसीमधील प्रकल्पापेक्षा कमी नाही.
    पटनायक यांनी प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच केली आहे. त्यानंतर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य वाढेल.
    जगन्नाथ संस्कृतीचा जगभरात प्रसार करणे आणि जगभरातून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    प्रकल्प काय आहे

    • जगन्नाथ मंदिराभोवती ‘ग्रीन’ कॉरिडॉर
    • पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १८ मठांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
    • पर्यटकांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी ५०० चौरस मीटरचा विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे.
    • दक्षिण व पश्चिम वेशीवर माहिती व रक्तदान केंद्र
    • पर्यटकांसाठी विशेष स्वच्छतागृहे, पोलिस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, एटीएम सुविधाही असतील
    • हेरिटेज कॉरिडॉरची नऊ झोनमध्ये विभागणी
    • सात मीटरचा ग्रीन बफर झोन त्यानंतर १० मीटर अंतर परिक्रमा मार्ग
    • परिक्रमा मार्ग देवतांच्या मिरवणुकीसाठी असेल
    • यात्रेकरूंसाठी ८ मीटरचा बाह्य प्रदक्षिणा मार्ग
    • स्वच्छतागृहांसह १० मीटर सार्वजनिक वाहतूक क्षेत्र, पाण्याचे कारंजे
    • माहिती-सह-दानपेटी आणि निवारा मंडप
    • प्रशस्त पदपथ, ६ हजार लोक बसतील एवढी जागा
    • ४ हजार कुटुंबासाठी लॉकरुम व्यवस्था
    • सर्व १८ मठ कलिंग शैलीतील वास्तुकलेनुसार विकसित केले जात आहेत.

    World Class Heritage Corridor in Jagannath Puri Temple area; Naveen Patnaik’s ‘Dream Project’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले