विशेष प्रतिनिधी
जिनेव्हा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे म्हणून शाळा बंद ठेवणे योग्य नाही असे मत जागतिक बँकेचे शिक्षण संचालक जैमी सावेड्रा यांनी व्यक्त केले आहे. शाळा सुरू राहिल्याने करोनाचा कहर होईल किंवा शाळा ही असुरक्षित ठिकाणे आहेत याचे कोणतेही पुरावे नसल्याने करोनाकाळात शाळा बंद करण्याचे समर्थन करता येणार नाही, असे सांगितले.World Bank experts say it is inappropriate to close schools during the Corona period
कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर अखेरचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवता येतील, असे ते म्हणाले.अनेक देशांत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण झाले असले तरी अद्याप लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. पण लहान मुलांच्या लसीकरणापर्यंत प्रतीक्षा करणार का, असा सवाल करत सावेड्रा म्हणाले,
बालकांच्या लसीकरणाची प्रतीक्षा करणे निरर्थक असून यामागे कोणतेही विज्ञान नाही. करोनाचा प्रसार होणे आणि शाळा सुरू होणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. जर उपाहारगृहे, बार, शरॉंपग मॉल सुरू असतात तर शाळा बंद करण्याचे कारण काय. शाळा बंद ठेवणे हे तथ्यहीन आहे.
२०२० मध्ये आपण अज्ञानाच्या समुद्रात नौकानयन करत होतो. करोना महासाथीवर नियंत्रण आणण्यासाठीची सर्वोत्कृष्ट उपाययोजना कोणत्या याबाबत आपल्याला काहीही माहीत नव्हते. जगातील बहुतेक देशांची तात्कालिक प्रतिक्रिया शाळा बंद ठेवण्याची होती.
मात्र त्यानंतर आता काळ खूपच बदलला असून २०२०च्या अखेरीस आणि २०२१ मध्ये कोरोनाबाबत बरीच वैज्ञानिक माहिती आणि पुरावे हाती आली आहे. अनेक देशांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या देशांमध्ये शाळा सुरू झाल्या
असून तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे दिसून आले असून करोना महासाथीचा कोणताही परिणाम या शाळांवर झाला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे, असे जागतिक बँकेच्या शिक्षण संचालकांनी सांगितले.
World Bank experts say it is inappropriate to close schools during the Corona period
महत्त्वाच्या बातम्या
- Goa Election : पर्रीकरांच्या मुलाच्या तिकिटाचा मुद्दा चर्चेत, उत्पल पर्रीकरांच्या पणजीत घरोघरी भेटी सुरू, अपक्ष लढणार की आप-शिवसेनेत जाणार?
- पुणे शहरात कोरोनाबाधीत ५ रुग्णांचा मृत्यू
- UP Election : आपकडून 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ३८ उमेदवार पदव्युत्तर, डॉक्टर, इंजिनिअर्सचाही समावेश
- नाशिकमध्ये लागली घराला आग ,जळाली सारी लग्नाची शिदोरी