• Download App
    महिला सुरक्षा : राजस्थान मध्ये 8 वर्षीय मुलीवर बलात्कार तर तामिळनाडूमध्ये नातेवाईकांकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून 16 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न | Women's security: 8-year-old girl raped in Rajasthan, 16-year-old girl attempted suicide in Tamil Nadu after repeated harassment by relatives

    महिला सुरक्षा : राजस्थान मध्ये ८ वर्षीय मुलीवर बलात्कार तर तामिळनाडूमध्ये नातेवाईकांकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून १६ वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    अजमेर : राजस्थानमध्ये एक अतिशय दुखद घटना घडली आहे. 8 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 31 वर्षीय ट्रक ड्रायव्हरने बलात्कार केला. आणि बलात्कार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल प्लॅटफॉर्मवर टाकला. जेव्हा मुलीच्या आई वडिलांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ त्यांनी पाहिला, त्यावेळी त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांमध्ये याबाबतीत तक्रार केली. जेव्हा मुलीला या घटनेबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की, त्याने त्याच्या घरी काम आहे म्हणून बोलावले होते तेव्हा हा व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केला.

    Women’s security: 8-year-old girl raped in Rajasthan, 16-year-old girl attempted suicide in Tamil Nadu after repeated harassment by relatives

    प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस च्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 10 दिवसांपूर्वी रेकॉर्ड केला गेला होता. टाईम्स ऑफ इंडियाने या घटनेची माहिती दिली होती.


    साकीनाक्यापासून पुणे, परभणी – भिवंडीपर्यंत महिलांवर बलात्कार; ठाकरे – पवार सरकार आणि राज्यपाल यांच्यात मात्र “लेटर वॉर”


    तामिळनाडूमध्ये घटलेल्या आणखी एका घटनेमध्ये 16 वर्षीय मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण तिच्याच नातेवाईकांकडून तिच्यावर वारंवार होणारा बलात्कार. एम सारावन कुमार असे त्या संबंधित नातेवाईकाचे नाव आहे. आपण तुझ्या प्रेमात आहोत, आपण लग्न करू या फालतू गोष्टी सांगत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या सर्व घटने मुळे मुलीची मानसिक अवस्था बिघडली. शेवटी वैतागून तिने शाळेत आपल्या डाव्या हाताची नस कापून घेतली. जेव्हा शाळेतील शिक्षकांना यासंबंधी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

    देशात आज घडलेल्या या दोन घटनांमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. बलात्कार झाल्यानंतर तात्काळ गुन्ह्याची नोंद केली जावी, गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जावी असे कायदे जरी असतील तरी गुन्हा होण्या आधीच स्त्रियांच्या संरक्षणासाठी काहीतरी ठोस पावले सरकारने उचलावीत. नकळत वयात झालेल्या अत्याचाराची जाणीवही 8 वर्षाच्या मुलीला नसते. तेव्हा अश्या घटना थांबवण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत.

    Women’s security: 8-year-old girl raped in Rajasthan, 16-year-old girl attempted suicide in Tamil Nadu after repeated harassment by relatives

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!