• Download App
    पुरुषांपेक्षा महिलाच दारू पिण्यात आघाडीवर, राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ सर्वेक्षणातून समोर|Women lead more than men in alcohol consumption, according to the National Family Health Survey

    पुरुषांपेक्षा महिलाच दारू पिण्यात आघाडीवर, राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ सर्वेक्षणातून समोर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात दारु पिणाऱ्या पुरुषांची संख्या घटली आहे मात्र महिलांची संख्या वाढली आहे, असे राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ सर्वेक्षणातून समोर आले आहे.
    राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य सर्वेक्षणाने ओडिशामध्ये एक सर्वेक्षण केले आहे.Women lead more than men in alcohol consumption, according to the National Family Health Survey

    अहवालानुसार ओदिशात 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दारुचं सेवन करणाऱ्या महिलांची संख्या 2015-16 मध्ये 2.4 टक्के होती. तीच संख्या 2020-21 मध्ये वाढून 4.3 टक्के इतकी झाली आहे. पुरुषांच्या बाबतीच हाच आकडा 2015-16 मध्ये 39.3 टक्के होता, तो आता कमी होऊन 28.8 टक्के इतका झाला आहे.



    ओदिशाच्या ग्रामीण भागात 15 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुष आणि महिला दारु पिण्यात आघाडीवर आहेत. शहरांतील पुरुष आणि महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त दारु पितात, असंही समोर आलं आहे. शहरात 22.7 टक्के तर ग्रामीण भागात तब्बल 30. 2 टक्के महिला या दारु पितात.

    शहरातील दारु पिणाऱ्या पुरुषांची संख्या 32.2 वरुन 22.7 टक्क्यांवर आली आहे. तर महिलांची संख्या ग्रामीण भागात 4.9 तर शहरात 1.4 टक्के असल्याचं सर्वेक्षणात दिसून आले आहे. महिलांमध्ये फक्त दारु पिण्याच्या बाबतीतच वाढ झाली आहे, अशातला भाग नाही. तर तंबाखूच्या बाबतीतही हीच गोष्ट दिसून आलं आहे. 2015-16 च्या दरम्यान 17.3 टक्के महिलांना तंबाखू खायची सवय होती. आता हेच प्रमाण वाढून 26 टक्क्यांपर्यंत पोहोचलंय.

    महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाणही वाढले आहे. 2015-16 च्या दरम्यान 17.3 टक्के महिलांना तंबाखू खायची सवय होती. आता हेच प्रमाण वाढून 26 टक्क्यांपर्यंत पोहोचलंय.
    शहरात 16.6 टक्के महिला तंबाखूचं सेवन करतात. तर गावात 26 टक्के महिला तंबाखूचं सेवन करतात.

    तंबाखू खाण्याºया पुरुषांची संख्याही कमी झाली आहे. 55.9 टक्के पुरुषांना जिथं तंबाखूचं आधी व्यसन होतं. त्याऐवजी आता 51.6 टक्के पुरुष तंबाखूचं सेवन करत असल्याचं दिसून आलं आहे.

    Women lead more than men in alcohol consumption, according to the National Family Health Survey

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल