विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीच्या विधानसभा उमेदवार शायना एनसी यांचा “इम्पोर्टेड माल” नही चलेगा म्हणून अपमान करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला गेला आहेच, त्याच बरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गंभीर दखल घेऊन खासदार सावंत यांच्यावर कठोर कारवाईच्या सक्त सूचना मुंबई पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला दिल्या.Women dignity is more important than politics strict action against Arvind Sawant
अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल राज्य महिला आयोग पाठोपाठ आता राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील घेतली. त्यामुळे आता अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. “इंपोर्टेड माल” इथे काम करत नाही. इथे फक्त “ओरिजनल माल” काम करतो”, असं वक्तव्य करून अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांचा अपमान केला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, असं विजया रहाटकर म्हणाल्या. तसेच मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आदेश विजया रहाटकर यांनी दिले आहेत. अशा वक्तव्यांवर निवडणूक आयोगानेही कारवाई करावी, असं विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. विजया रहाटकर यांनी एक्स (X) वर भूमिका मांडली.
विजया रहाटकर यांनी काय म्हटलं आहे?
“शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या खासदार शायना एन. सी. यांच्याबाबत अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं आहे. दिवाळी सुरु आहे, लक्ष्मीपूजन होत आहे. या पवित्र आनंद पर्वात खासदार सारखे जबाबदार लोकप्रतिनिधी महिलांच्या विरोधात अशाप्रकारचं वक्तव्य करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. शायना एन. सी. यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दाखल घेत कारवाई केली पाहिजे”, असं विजया रहाटकर म्हटलं आहे.
मी पुन्हा एकदा राजकीय पक्ष आणि जबाबदार लोकप्रतिनिधींना आवाहन करते की, महिलांचा सन्मान करा. महिलांचा सन्मान, गरिमा आणि प्रतिष्ठेशी कोणतीही छेडछाड होता कामा नये. महिलांचा सन्मान हा राजकारणापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान सुरु असलेल्या या चुकीच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी देखील सूचनाही विजया रहाटकर यांनी केली आहे.
Women dignity is more important than politics, take strict action against Arvind Sawant
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मौलाना सज्जाद नोमानींना मनोज जरांगेंमध्ये “दिसले” गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद!!
- Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा हिशोब आता होणार
- Rajasthan : राजस्थानात गोध्रा प्रकरण असलेले पुस्तके मागे घेतले; आता शाळेत हा धडा शिकवला जाणार नाही
- Manoj Jarange जरांगेंची दिली हाक नव्या परिवर्तनाची; एकाच खात्यात 2 – 2 मंत्री, 7 – 8 उपमुख्यमंत्री करायची तयारी!!