प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातील कलहाचे विविध कंगोरे समोर येत आहेत. एकामागून एक नवीन समस्या समोर येत आहेत. आता पक्षाच्या युवा शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत, तर दुसरीकडे हे आरोप केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी महिला नेत्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.Woman leader accuses senior Congress leader Srinivas BV of sexual abuse, victim’s question – What happened to ‘Ladki Hoon Ladh Sakite Hoon’?
हे प्रकरण आसामशी संबंधित आहे. भारतीय युवक काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षा अंगकिता दत्ता यांनी मंगळवारी त्यांच्या युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला, त्यांनी जाहीरपणे माफी न मागितल्याने कायदेशीर कारवाईची मागणी केली आणि त्यानंतर श्रीनिवास यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली.
माझ्याच बाबतीत असे, मग मी इतरांना कशी प्रोत्साहन देऊ? : अंगकिता दत्ता
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांचे वर्णन ‘सेक्सिस्ट’ आणि ‘चॉव्हिनिस्टिक’ म्हणजेच पुराणमतवादी म्हणून करत, महिला नेत्याने ट्विट केले आणि आरोप केला की, “मी एक महिला नेता आहे. मला स्वतःला अशा छळाचा सामना करावा लागला तर मी इतर महिलांना संघटनेत सामील होण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकते.
ट्विट्सच्या मालिकेत, महिला नेत्याने भारतीय युवक काँग्रेसचे श्रीनिवास आणि त्यांचे भारतीय युवक काँग्रेसचे सचिव प्रभारी यांच्यावर “सतत” छळ केल्याचा आणि सहा महिन्यांपासून लिंगाच्या आधारावर भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला.
राहुल गांधींनीही कारवाई केली नाही : अंगकिता दत्ता
महिला नेत्या अंगकिता दत्ता यांनी आरोप केला आहे की, त्यांनी या संदर्भात पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे अनेकदा तक्रार केली होती, परंतु या मुद्द्यावर त्यांच्याविरोधात कोणतीही चौकशी समिती स्थापन करण्यात आली नव्हती. अंगकिता यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही आरोप करत म्हटले की, या प्रकरणाची माहिती असूनही त्यांनी आमच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.
अंगकिता दत्ता यांनी असा दावा केला होता की, या वर्षी जानेवारीत काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ जम्मूला पोहोचत असताना त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे श्रीनिवास यांच्याविरोधात सतत मानसिक छळ आणि अपशब्द वापरल्याबद्दल तक्रार केली होती.
मात्र, याप्रकरणी कोणतीच कारवाई झाली नसून चौकशी समितीही स्थापन झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या ‘लडकी हूं लड सकती हूं’ या प्रसिद्ध मोहिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या मोहिमेचे काय झाले? असा सवालही त्यांनी केला. चांगला जनसंपर्क असल्याने श्रीनिवास हे सर्व प्रकारच्या गैरकृत्यांपासून वाचत असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी मंत्र्याच्या कन्या आहेत अंगकिता दत्ता
अंगकिता दत्ता या आसामचे माजी मंत्री अंजन दत्ता यांच्या कन्या आहेत. अंजन दत्ता हे आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले आहेत. स्वत: अंकिताने राज्याच्या अमगुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे.
दुसरीकडे, भारतीय युवक काँग्रेस (IYC) च्या लीगल सेलचे प्रमुख रूपेश एस. भदौरिया यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की हे आरोप “राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि पूर्णपणे बनावट” आहेत.
नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, प्रसिद्ध शारदा चिटफंड घोटाळा आणि ईडी/पीएमएलए प्रकरणांमध्ये अंगकिता दत्ताचे नाव आले आहे आणि त्या सध्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सतत संपर्कात आहे. काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेले खटले बंद करण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासोबतच त्यांनी श्रीनिवास यांच्यावर यापूर्वीही असे निराधार आरोप केले होते, असेही सांगण्यात आले.
नोटीस मिळताच रुपेश भदोरिया यांनी महिला नेत्याला सोशल मीडियावर आणि श्रीनिवास यांच्या नातेवाईकांची माफी मागायला सांगितले. तसे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.
Woman leader accuses senior Congress leader Srinivas BV of sexual abuse, victim’s question – What happened to ‘Ladki Hoon Ladh Sakite Hoon’?
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??
- मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!
- ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!
- राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!