• Download App
    CM yogi योगींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून

    CM yogi : योगींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक; लिहिलं होतं- राजीनामा दिला नाही तर बाबा सिद्दिकींसारखे हाल करू

    CM yogi

    वृत्तसंस्था

    लखनऊ : CM yogi  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. फातिमा खान (24) असे आरोपी महिलेचे नाव असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्यांनी शनिवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला संदेश दिला होता. त्यात लिहिले होते- योगींनी 10 दिवसांत राजीनामा दिला नाही तर त्यांची अवस्था बाबा सिद्दिकींसारखी होईल.CM yogi

    महिलेने असे का केले? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, ही महिला श्रीमंत कुटुंबातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. बऱ्यापैकी शिक्षित आहे. पोलिसांनी तिला कोठून अटक केली? याचा खुलासा करण्यात आलेला नाही.



    वास्तविक, शनिवारी मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतरच मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देऊन तपास सुरू केला. ही महिला मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, हे सीएम योगी यांच्याशी संबंधित प्रकरण असल्याने मुंबई पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करत आहेत.

    बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती

    राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मुंबईत हत्या करण्यात आली होती. सिद्दिकींचा मुलगा झिशानच्या ऑफिसमधून बाहेर पडला होता. त्यानंतर त्यांच्यावर 6 गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दिकींच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री 11.27 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली.

    Woman arrested from Mumbai for threatening CM yogi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स