वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत पुढील काही वर्षे सर्वात वेगाने प्रगती करणारा देश ठरणार आहे. त्यामुळे पाच वर्षांत म्हणजे २०२८ पर्यंत जगातील अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत भारताची भागीदारी वाढून १८ टक्के होईल. सध्या हा वाटा १६ टक्क्यांहून कमी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) ताज्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.WMO Report India’s share in world economic growth will increase to 18 percent in 5 years, GDP growth will be highest in the world
२०२२ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार २८२ लाख कोटी रुपये होता. २०२८ पर्यंत तो ५०० लाख कोटी रुपये होऊ शकतो. भारत व चीन मिळून आर्थिक विकासात ५० टक्के भागीदारी असेल. भारतात यंदा जीडीपी ग्रोथ रेट ६.३ टक्के राहू शकतो. तसे झाल्यास तो जगात सर्वाधिक असेल. क्रिसिलचे प्रमुख अर्थतज्ज्ञ डी.के. जोशी म्हणाले, देशात भौतिक पायाभूत साधने वेगाने वाढू लागली आहेत. त्याचा परिणाम मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात स्पष्टपणे दिसू लागला आहे. कमकुवत मान्सूनमुळे कृषी क्षेत्राची स्थिती आगामी काळात थोडी कमकुवत राहू शकते.
भारतीय रुपया अमेरिकन डॉलरला वगळता सर्व चलनाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बळकट राहिले. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.३ टक्के कमकुवत झाला. चिनी युआन ०.७ टक्के, यूरो २.२ टक्के, ब्रिटिश पाऊंड २.५ टक्के घटला. त्यामुळेच रुपया मजबुतीच्या दिशेने आहे.
आरबीआयच्या पाहणीत मध्यमवर्गाशी संबंधी गरजेच्या वस्तूंचे दर घटू लागले आहेत. बहुतांश वस्तूंचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ७-८ टक्के जास्त आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये महागाई दर १२ टक्के होते. आता ६.३ टक्क्यांवर आले. काही महिने महागाईचे सातत्याने चटके बसले होते.
बेरोजगारीच्या दरात सतत घट
देशात बेरोजगारी दर मे २०२३ मध्ये ८ टक्क्यांहून जास्त झाली होती. आता तो ७.१ टक्के एवढा घसरला. देशातील ३९.९७ टक्के लोकसंख्येकडे रोजगार आहे. ४०.८७ टक्के योग्य श्रमशक्तीकडे खूप जास्त काम आहे. रोजगार वाढू लागल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटले.
भारतीय ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास जगात सर्वाधिक आहे. ग्राहक निर्देशांक ९० आहे. तर युरोझोनमध्ये ६० आहे. इंग्लंड वगळता संपूर्ण युरोझोन व अमेरिकेत ग्राहकांचा विश्वास सातत्याने ढासळू लागला आहे.
WMO Report India’s share in world economic growth will increase to 18 percent in 5 years, GDP growth will be highest in the world
महत्वाच्या बातम्या
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती
- मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
- पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!
- WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी