वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानने कर्तारपूर साहेब कॉरिडॉर खोलत भारतीय भाविकांना कर्तारपूर साहेब येथे येऊन दर्शन घेण्याची मुभा दिली आहे, तर दुसरीकडे दहशतवादी संघटना तहरिक ए लबैक या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या साद रिझवी याला तुरुंगातून सोडून दिले आहे. पाकिस्तानची ही दुटप्पी भूमिका आंतरराष्ट्रीय मीडियात टीकेचे लक्ष्य ठरली आहे.With the reopening of Kartarpur corridor, a delegation of Punjab Cabinet led by CM Charanjit Singh Channi paid obeisance at Gurdwara
कर्तारपूर साहेब कॉरिडॉर खोलून भारताच्या पंधराशे भाविकांना दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. आज पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह कर्तारपूर साहेब येथे जाऊन गुरुद्वारात प्रार्थना केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदावी, अशी इच्छा व्यक्त केली.
एकीकडे पाकिस्तानने या प्रकारची आस्था दाखवत असताना दुसरीकडे मात्र ज्या संघटनेवर पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांवर हल्ले करण्याचा आरोप आहे ती दहशतवादी संघटना तहरिक ए लबैकचा म्होक्या साद रिझवी याला तुरुंगातून सोडून दिले आहे. एवढेच नाही तर
तहरीक ए लबैक या संघटनेला दहशतवादी संघटनांच्या यादीतून देखील पाकिस्तानने वगळून टाकले आहे. पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेवर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये कडाडून टीका होताना दिसते आहे. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेकडे पाकिस्तान सरकार किती दुर्लक्ष करते हे याचेच उदाहरण आहे, असे विविध युरोपीय वृत्तपत्रांनी वर्णन केले आहे.
With the reopening of Kartarpur corridor, a delegation of Punjab Cabinet led by CM Charanjit Singh Channi paid obeisance at Gurdwara
महत्त्वाच्या बातम्या
- स्मृती इराणी यांची पहिली कादंबरी लाल सलाम लवकरच वाचकांच्या भेटीला, नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना अनोखी श्रध्दांजली
- एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी हैदराबादमध्ये वसीम रिझवी यांच्याविरोधात केली तक्रार दाखल
- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांची एसआयटी चौकशी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- Malik V/s Wankhede : नवाब मलिकांनी समीर वानखेडेंविरोधात दिले पुरावे, मुंबई उच्च न्यायालयात जन्म प्रमाणपत्र सादर