विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर जमिनीस्तरावर फार मोठे बदल घडून येत आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा बदल शेतीमध्ये दिसून येतो मोकळा श्वास घेऊन नवनवीन प्रयोग करताना दिसतो आहे. With the help of Central Government’s ‘Aroma Mission’, 1000 farmer families of Bhaderwah in district Doda switched from traditional maize crop farming to aromatic lavender farming giving a major boost to AtmanirbharBharat
असाच एक महत्त्वाचा प्रयोग काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील बदरवाह या गावात यशस्वी झाला आहे. या जिल्ह्यातील १००० शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अरोमा मिशन अर्थात सुंगधी शेती मिशनचा लाभ घेऊन सुगंधी फुलांची अर्थात लव्हेंडरची शेती सुरू केली आहे. हे शेतकरी पूर्वी फक्त एका मोसमात मक्याची शेती करायचे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात त्यांची गुजराण चालायची.
पण केंद्र सरकारने काश्मीरमधल्या विशिष्ट वातावरणाचा लाभ मिळू शकेल, अशा सुगंधी फुलांच्या आणि वनस्पतींच्या शेतीसाठी आणि तिच्या प्रयोगासाठी अरोमा मिशन ही योजना आखली. यामध्ये शेतकऱ्यांना सुगंधी फुले आणि सुगंधी वनस्पतीच्या शेतीची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा लागवडीपासून त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत अनुदान आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्या.
आता या अरोमा मिशनचा लाभ बदरवाह जिल्ह्यातील १००० शेतकरी घेत आहेत. त्यांच्या उत्पन्नात आणि त्यामुळे राहणीमानात सकारात्मक बदल झाला आहे. त्यांची पुढची पिढी नवीन प्रयोगासाठी पुढे येते आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या सुगंधी लव्हेंडर शेतीच्या प्रयोगाचे फोटो आणि माहिती ट्विटरवरून शेअर केली आहे.