• Download App
    यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा | With the formation of BJP govt in Bengal, goons of TMC will meet the same fate like the goons of UP

    यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा

    वृत्तसंस्था

    जांगीपारा – यूपीतले गुंडाराज भाजपच्या शासनाचे संपविले. यूपीतल्या गुंडांना गुडघे टेकायला लावले. तसेच बंगालमध्ये भाजपचे शासन आल्यानंतर तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांना आणि त्यांनी पोसलेल्या गँगस्टर्सना गुडघे टेकायला लावू, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. With the formation of BJP govt in Bengal, goons of TMC will meet the same fate like the goons of UP

    जांगीपाराच्या सभेत ते बोलत होते. योगी म्हणाले की, भाजप विकासाचा अजेंडा घेऊन बंगालमध्ये लढतोय. तृणमूळ काँग्रेसचे गुंड भाजपच्या मार्गात अडथळा आणतात. अशीच अवस्था काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये होती. दगडफेक, जाळपोळ तिथे नित्याचे झाले होते. पण ३७० हटले. आता तिथे भारतीय कायद्याचे राज्य आहे. तिथे शांतता आहे. दगडफेक बंद झाली आहे. २ मे नंतर बंगालमध्येही शांतता येईल. तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांची, गँगस्टर्सची सद्दी संपेल.



    यूपीत एकेकाळी मोठमोठे गुंड आणि गँगस्टर्स थैमान घालत होते. ते आज सगळे गुडघ्यावर आलेत. कायद्याच्या शासनाने गुंडांना यूपीत गुडघे टेकायला लावले. तसेच बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांना आणि गँगस्टर्सना गुडघे टेकायला लावू, असा इशारा योगींनी दिला.

    योगी हे बंगालमध्ये मोदी – शहा – नड्डा यांच्यापाठोपाठचे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. यूपीतली गुंडगिरी पूर्ण मोडून काढल्यानंतर त्यांच्या भोवती एक राजकीय वलय तयार झाले आहे. त्याचा भाजप बंगालसह आसाम, केरळमध्ये प्रामुख्याने उपयोग करून घेताना दिसतोय.

    With the formation of BJP govt in Bengal, goons of TMC will meet the same fate like the goons of UP

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य