एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) प्रमुख बिल नेल्सन यांनी दिला दुजोरा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने आता चंद्रावरही आपली छाप सोडली आहे. तसेच, देश अवकाशात नवनवीन पराक्रम गाजवण्याच्या मार्गावर आहे. तंत्रज्ञानाच्या जगात भारत पुढे पुढे जात आहे. भारतानेही आपले शास्त्रज्ञ अवकाशात पाठवण्याची पूर्ण तयारी केली आहे. आता या कामात नासा इस्रोला मदत करत असल्याची चर्चा आहे.With NASAs support to ISRO, the dream of conquering space will soon be fulfilled
यूएस स्पेस एजन्सी दोन्ही देशांमधील महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी काम करत आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) प्रमुख बिल नेल्सन यांनी स्वतः याला दुजोरा दिला आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था भारतासोबत सहकार्य वाढवेल, असे नासाचे प्रशासक नेल्सन यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) नासा भारतीय अंतराळवीरांसोबत “एकत्र काम” करेल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष जेक सुलिव्हन यांच्यात सोमवारी अमेरिका आणि भारत यांच्यातील ICET चर्चेनंतर नेल्सन यांची प्रतिक्रिया आली.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर इस्रोच्या अंतराळवीरांसोबतच्या संयुक्त प्रयत्नांसह आम्ही एकत्रितपणे अवकाशात आमच्या देशांचे सहकार्य वाढवत आहोत. हे प्रयत्न भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाणांना समर्थन देतील आणि पृथ्वीवरील जीवन सुधारतील.’ असंही सांगण्यात आलं आहे.
With NASAs support to ISRO, the dream of conquering space will soon be fulfilled
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार