मुंबई पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट वाइनबद्दल आहे. खरेतर, नुकतेच महाराष्ट्र सरकारने नवीन वाइन धोरण मंजूर केले आहे, ज्याच्या अंतर्गत सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाइन खरेदी आणि विक्री करता येईल. Wine Dispute Will you be arrested for driving under the influence of wine? Mumbai Police’s response to a question asked on Twitter went viral
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट वाइनबद्दल आहे. खरेतर, नुकतेच महाराष्ट्र सरकारने नवीन वाइन धोरण मंजूर केले आहे, ज्याच्या अंतर्गत सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाइन खरेदी आणि विक्री करता येईल.
वाइनच्या या नव्या धोरणाला भाजपने विरोध केला, तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पक्षाला फटकारले आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईनची विक्री झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, वाइन म्हणजे दारू नाही. वाईनची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, त्यांना फक्त आंदोलन करायचे कळते, शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत.
मुंबई पोलिसांचे उत्तर
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिवम वहिया नावाच्या युजरने ट्विटरवर मुंबई पोलिसांना गंमतीने टॅग करत ‘आता मी वाईन पिऊन गाडी चालवली तर मला जवळचा बार दाखवाल की तुरुंगात टाकाल? या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी म्हटले की, “सर, तुम्ही एका जबाबदार नागरिकाप्रमाणे मद्यपान करून गाडी चालवू नये, अशी आमची इच्छा आहे. दुसरीकडे, ब्रेथ अॅनालायझरमध्ये अल्कोहोल आढळले तर (जे आढळणारच) तुम्हाला आमचे पाहुणे व्हावे लागेल.”
मुंबई पोलिसांच्या उत्तराचे कौतुक
मुंबई पोलिसांच्या या उत्तराचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. काही युजर्सनी कमेंट करून ते अगदी बरोबर म्हटले आहे. एका युजरने कमेंट करत म्हटले की, “हो, दारू पिऊन गाडी चालवणे अजिबात योग्य नाही. या प्रकरणात लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे.”
Wine Dispute Will you be arrested for driving under the influence of wine? Mumbai Police’s response to a question asked on Twitter went viral
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, नवीन तथ्यांसह एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज
- पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना एक फेब्रुवारीला जाहीर होणार
- शिलाटणे गावाजवळ अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
- आधी पुनर्वसन, मगच धरण; कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणग्रस्तांची सडेतोड भूमिका; काम पडले बंद