वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करत त्यांनी विचारले आहे की, तुम्ही भाजप सोडत आहात का? याचे उत्तर खुद्द नितीन गडकरी यांनी कोणाचेही नाव न घेता दिले आहे.Will you quit BJP Gadkari replied to AAP MP Sanjay Singh’s tweet
वास्तविक हे ट्विट भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था असलेल्या संसदीय मंडळातून नितीन गडकरींना बाहेर गेल्यावर करण्यात आले आहे. यानंतर गडकरींबाबत अनेक प्रकारच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत.
नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद असल्याचे विरोधी पक्षात बसलेले अनेकजण सांगू लागले. गडकरी हे त्यांच्या विकासकामांमुळे खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही स्वत:ला असुरक्षित वाटत असल्याचा जावईशोध अनेकांनी लावला आहे. एवढेच नाही, गडकरींनंतर राजनाथ सिंह यांचा नंबर येईल. यानंतर पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी भाजपमध्ये कोणीही उरणार नाही, असेही दावे सुरू झाले. यादरम्यान आप नेते संजय सिंह यांच्या ट्विटनेही वेगळी चर्चा सुरू केली.
पद असो वा नसो, मला काही फरक पडत नाही!
नितीन गडकरी यांनी कोणाचेही नाव न घेता, आपल्या विरोधात अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कायद्याची मदत घेऊ शकतो, असे आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. नितीन गडकरींचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि आम आदमी पक्षाच्या खासदाराने ट्विट केला आहे, त्या व्हिडिओमध्ये ते असे म्हणताना दिसत आहेत की पद असो वा नसो, त्यांना काही फरक पडत नाही.
व्हायरल व्हिडिओत नितीन गडकरी काय म्हणाले?
नितीन गडकरी या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत, ‘ते नसेल तर हरकत नाही. माझे पद असो वा नसो, काळजी करू नका. मी व्यावसायिक राजकारणी नाही. काय होईल ते पाहता येईल. मी एक सामान्य नागरिक आहे. अजूनही फुटपाथवर खाणारा, थर्ड क्लासमध्ये पिक्चर पाहणारा आणि मागे बसून नाटक पाहणारा आहे. मी लोकांमध्ये राहिलो, मोठा झालो. मला तेच जीवन आवडते. Z+ सुरक्षिततेमध्ये अडचणी आहेत. मी त्या सर्वांना सोडून रात्री निघून जातो.”
चुकीच्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल गडकरींचा इशारा
चुकीच्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल करू नका, असा इशारा गडकरींनी दिला आहे. कायद्याची मदत घेण्यात अजिबात मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत गडकरी म्हणाले की, ‘राजकीय फायद्यासाठी पुन्हा एकदा माझ्या विरोधात खोटी मोहीम राबवून काही मुख्य प्रवाहातील मीडिया, सोशल मीडिया आणि काही लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील माझे विधान चुकीच्या पद्धतीने मांडले आहे.’
नितीन गडकरींनी मूळ व्हिडिओ केला शेअर
गडकरी पुढे म्हणाले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी कधीच अशा दुर्भावनापूर्ण अजेंडाचा त्रास होऊ दिला नाही. पण मी अशा सर्व लोकांना इशारा देतो की, अशी गुंडगिरी चालू राहिल्यास माझे सरकार, पक्ष आणि माझ्या लाखो कष्टकरी कार्यकर्त्यांचे हित लक्षात घेऊन या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. मी जे बोललो त्याची लिंक शेअर करत आहे.” गडकरींनी आपल्या ट्विटसोबत आपल्या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओचे काही भाग कापून म्हणजेच व्हिडिओशी छेडछाड करून संपादित व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.
Will you quit BJP Gadkari replied to AAP MP Sanjay Singh’s tweet
महत्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये सत्तासंकट : मुख्यमंत्री सोरेन यांची आमदारकी रद्द, तरीही पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता
- मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!
- महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ठाकरे सरकारचा प्रभाग पुनर्रचनेचा डाव; फडणवीसांचा गौप्यस्फोट