वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना सातत्याने टार्गेटवर ठेवले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र 2023 मध्ये आत्तापर्यंत तीन वेळा गौतम अदानींच्या भेटी घेतल्या. काल तर ते गौतम अदानींच्या अहमदाबादच्या घरी मुक्कामाला होते. त्यांनी अदानींच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. Will Rahul Gandhi speak against Pawar going to Adani’s house?
मात्र याच मुद्द्यावरून आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी राहुल गांधींना एक बोचरा सवाल केला आहे. राहुल गांधी गौतम अदानी मुद्द्यावर भाजपला टार्गेट करतात. पण काँग्रेसच्याच I.N.D.I आघाडीतले समन्वयक शरद पवार त्यांच्या घरी जाऊन भेटतात. आता राहुल गांधी शरद पवारांविरुद्ध बोलणार आहेत का??, असा सवाल हेमंत विश्वशर्मा यांनी केला. पवार – अदानी भेटीवरून त्यांनी काँग्रेसची विशेषतः राहुल गांधींची कोंडी केली.
हेमंत विश्वशर्मा म्हणाले, माझ्यासारखा भाजपचा एक नेता गौतम अदानींबरोबर दिसला असता, तर काँग्रेसवाले माझ्या अंगावर आले असते. पण आता त्यांच्याच I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार गौतम अदानींच्या घरी गेले. मग राहुल गांधी आता पवारांविरुद्ध बोलणार आहेत का??, इथेच राहुल गांधींची दुटप्पी भूमिका उघडी पडते, असा टोला हेमंत विश्वशर्मा यांनी लगावला.
राजस्थान, मध्य प्रदेश सह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेस जिंकेल, असे भाकीत राहुल गांधींनी जयपूर मध्ये एका मुलाखतीत केले. या मुद्द्यावरही हेमंत विश्वशर्मांनी राहुल गांधी आणि काँग्रेस दोघांनाही टोचले. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका भाजप जिंकेल, असे मी भाकीत केले असते, तर जयराम रमेश यांच्यासारख्या प्रवक्त्याने लगेच भाजपवर EVM फिक्स केल्याचा आरोप केला असता. मग आता राहुल गांधींनी काँग्रेसच्या विजयाचे भाकीत केले, याचा अर्थ काँग्रेसने EVM फिक्स केली आहेत का??, असा असा सवाल मी विचारला तर माझे काय चुकेल??, असाही टोला हेमंत विश्वशर्मा यांनी लगावला.
पवारांची गौतम अदानींबरोबर झालेली भेट आणि आज राहुल गांधींनी चार राज्यांच्या विधानसभा काँग्रेस जिंकणार असल्याचे केलेले भाकीत यावरून हेमंत विश्वशर्मांनी काँग्रेसला कोंडीत पकडले. काँग्रेसकडून अद्याप या मुद्द्यांची उत्तरे आलेली नाहीत.
Will Rahul Gandhi speak against Pawar going to Adani’s house?
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात 4 तासांत 4 इंच पाऊस; महिलेसह चौघांचा मृत्यू, 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवले, लष्कराला पाचारण
- रशियाच्या ब्लॅक सी नौदल मुख्यालयावर हवाई हल्ला; युक्रेनचा दावा- 9 रशियन अधिकारी ठार; ब्रिटन-फ्रान्सच्या मिसाइलचा वापर
- उतावळ्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग; पवार काका – पुतण्या – आत्यामध्येच रंगले मुख्यमंत्रीपदाचे रेसिंग!!
- पवारांची पॉवरफुल खेळी; अदानींच्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे गुजरातेत उद्घाटन!!