• Download App
    मोदी सरनेम मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळेल? सुरत न्यायालय आज देणार निकाल|Will Rahul Gandhi get relief in Modi surname defamation case? Surat court will give verdict today

    मोदी सरनेम मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळेल? सुरत न्यायालय आज देणार निकाल

    वृत्तसंस्था

    सुरत : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोदी सरनेम मानहानी खटल्यात दिलेल्या निर्णयावर आज (20 एप्रिल) सुरतचे आणखी एक न्यायालय निकाल देऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकर्ते आशावादी आहेत, आजच्या निर्णयात राहुल यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Will Rahul Gandhi get relief in Modi surname defamation case? Surat court will give verdict today

    गेल्या महिन्यात सुरतमधील एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींना मोदी आडनावाशी संबंधित एका प्रकरणात दोषी ठरवून कमाल दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तेव्हा देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. आजच्या निकालाने दोषसिद्धी आणि शिक्षेला स्थगिती दिली, तर राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल होऊ शकते.



    काय आहे संपूर्ण प्रकरण?

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार झाले होते. त्यापूर्वी त्यांनी निवडणूक प्रचारसभेत सर्व चोरांची आडनावे मोदी का आहेत? असा सवाल केला होता. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावरच 23 मार्च रोजी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. याच्या ठीक एका दिवसानंतर राहुल गांधींचे संसद सदस्यत्व काढून घेण्यात आले.

    3 एप्रिल रोजी राहुल गांधींनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वकिलांनीही दोन अर्ज दाखल केले, एक शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आणि दुसरा अपील निकाली निघण्यापर्यंत दोषी ठरविण्याच्या स्थगितीसाठी. राहुल यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने तक्रारदार पूर्णेश मोदी आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

    अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरपी मोगेरा यांच्या न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींच्या अर्जावरील निर्णय 20 एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता. गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावणाऱ्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध राहुलने केलेले अपील प्रलंबित असताना हा निकाल राखून ठेवण्यात आला होता.

    Will Rahul Gandhi get relief in Modi surname defamation case? Surat court will give verdict today

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार