वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इंडिया फर्स्ट हे धोरण सोडून आणि देशहिताशी तडजोड करून भारत कोणत्याही परिस्थितीत चीन आणि पाकिस्तान यांच्याशी संबंध वाढवणार नाही, अशा स्पष्ट शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ग्वाही दिली आहे.India will not abandon its “India First” policy and expand relations with China-Pakistan; Foreign Minister S. Jaishankar’s testimony!!
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी भारताची भूमिका सविस्तर मांडली. यामध्ये त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा “की वर्ड” “इंडिया फर्स्ट” आहे, हे स्पष्ट केले. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी “नेबर हूड फर्स्ट” या संकल्पनेचा खुलासा केला.
जयशंकर म्हणाले “नेबरहूड फर्स्ट” हे धोरण जरी मोदी सरकारने अवलंबले असले तरी त्याचे लाभ बांगलादेशासारख्या देशांनी घेतले आहेत. भारतालाही त्याचा लाभ झाला आहे. आज भारत बांगलादेशातील बंदरांचा वापर करून व्यापार वाढवू शकतो. सामरिक कारणासाठी त्याचा उपयोग देखील करू शकतो. पण चीन आणि पाकिस्तान यांच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्या देशाशी संबंध सुधारणे शक्य नाही. दहशतवादाचा मुद्दा बाजूला टाकून भारताने पाकिस्तानशी संबंध वाढवावेत ही अपेक्षा भारताकडून आता कोणी ठेवू नये. भारताचे धोरण वास्तववादी आहे आणि मोदी सरकारची ही तीच भावना आहे.
चीन आणि भारत हे संबंध जास्त गुंतागुंतीचे आहेत. दोन्ही देशांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान देवाण-घेवाण संबंध विस्तारत आहेत. पण चीननेच भारताचा विश्वास तोडून सीमावर्ती भागात अतिक्रमण केले. ही त्यांची चूक आहे. आणि भारत आपली एकही इंच भूमी चीनला दान देऊ शकत नाही. त्यामुळे हे चीनने ठरवायचे आहे की त्यांची भारताशी संबंध कसे ठेवायचे?, भारत आपले “इंडिया फर्स्ट” हे धोरण सोडून देऊन किंवा भारताच्या हिताशी तडजोड करून चीनशी देखील संबंध वाढवणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही जयशंकर यांनी दिली.
India will not abandon its “India First” policy and expand relations with China-Pakistan; Foreign Minister S. Jaishankar’s testimony!!
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार? निवडणूक आयोगाने हे दिले संकेत
- काँग्रेसच्या व्यापक मुस्लिम संपर्काची धास्ती म्हणून पवारांची भूमिका मुस्लिम धार्जिणी जास्ती!!
- ‘’… यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे’’ अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप!
- याला म्हणतात काँग्रेस : कर्नाटकात मोफत विजेच्या पोकळ घोषणा; प्रत्यक्षात वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा!!