• Download App
    कमलनाथ आज खरगे यांची भेट घेऊन राजीनामा देणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा! Will Kamal Nath meet Kharge and resign today Strong discussion in political circles

    कमलनाथ आज खरगे यांची भेट घेऊन राजीनामा देणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा!

    काँग्रेस हायकमांड नाराज असून राजीनामा मागितला जाऊ शकतो.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. येथे भारतीय जनता पक्षाने बंपर विजय मिळवत बहुमत मिळवले आणि काँग्रेसला मोठा पराभव दिला. Will Kamal Nath meet Kharge and resign today Strong discussion in political circles

    राज्यात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले होते की, जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. त्याचवेळी ते आज राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर यादरम्यान ते आपल्या पदाचा राजीनामाही देऊ शकतात, अशाही चर्चा सुरू आहेत.

    मध्य प्रदेशच्या निकालानंतर कमलनाथ यांना पक्षाच्या प्रदेश प्रमुखपदाचा राजीनामा देण्यास काँग्रेस हायकमांडकडून सांगितले जाऊ शकते. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि जेडीयू सुप्रीमो नितीश कुमार यांच्यासह इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांविरुद्ध जागावाटपाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेतृत्वही त्यांच्यावर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले.


    कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना कोमजले!!


    यासोबतच कमलनाथ यांनी सोमवारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट न घेतल्याने आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Will Kamal Nath meet Kharge and resign today Strong discussion in political circles

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य