विशेष प्रतिनिधी
लुधियाना – पंजाबमधील राजकीय रणसंग्रामात आता आम आदमी पक्षाने उडी घेतली असून पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य हमीचे आश्वा सन देताना सरकारी रुग्णालयांत रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केली आहे. Will give free medicines if came in power – Kejariwal
पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत, चांगले उपचार दिले जातील. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जातील तसेच आरोग्य चाचण्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर येथे सोळा हजार छोटी रुग्णालये सुरू करण्यात येतील. राज्यात सध्या जी रुग्णालये आहेत त्यांच्या स्थितीमध्येही सुधारणा केली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
Will give free medicines if came in power – Kejariwal
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला