स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरके आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सलमानचे करीअर संपवून त्याला रस्त्यावर आणण्याची धमकी केआरके ने दिली आहे.Will end Salman’s career and bring him on the streets, threatens Kamal R Khan
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरके आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सलमानचे करीअर संपवून त्याला रस्त्यावर आणण्याची धमकी केआरके ने दिली आहे.
सलमान खान आणि कमाल आर खान म्हणजेच केआरके यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. केआरकेने त्याच्या युट्युब व्हिडिओमध्ये सलमानवर अनेक आरोप केले होते ज्याचा विरोध म्हणून सलमानने केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
केआरकेने सलमानच्या ‘राधे’ ला निगेटिव्ह रिव्यू दिला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या पूवीर्ही केआरकेने चित्रपटाच्या विरुद्ध अनेक ट्वीट केले होते. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये सलमानवर अनेक आरोप देखील केले.
त्याने ‘बिईंग ह्युमन फाऊंडेशन’ ला खोटं सांगत पैसे उकळण्याचं एक माध्यम म्हटलं होतं. सलमानच्या कंपनी विरुद्ध चुकीची माहिती पसरवल्यामुळे सलमानने केआरकेविरुद्ध तक्रार दाखल केली.
केआरकेने केलेल्या ट्विटमध्येह म्हटले आहे की त्याने अनेकांचे करीअर संपविले असे ऐकले आहे. (सुना है उकी यह काफी लोगोंके करीअर खतम कर चुका है) जो कोणी त्याच्या विरुध्द बोलतो त्याचे करीअर हा संपवून टाकतो.
पण शेरास सव्याशेर मिळतोच. (नेहले पे देहला ही होता है ना). मी सव्वाशेर आहे. मी त्याचे करीअर संपवून त्याला रस्त्यावर आणील. (मैं इसका करीअर चौपट करके इसको सडक पे ले आऊॅँगा)यासंदर्भात गायक मिका सिंहनेही केआरकेवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की,
केआरके एक हलकट आणि पब्लिसिटीसाठी भूकेलेला माणूस आहे. त्याला असं वाटतं की सलमान सारख्या व्यक्तिनं त्याच्याबाबत काहीतरी बोललं पाहिजे कारण तो चर्चेत राहावा. तो अशा पद्धतीची वक्तव्य करुन आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात माहिर आहे,
सलमान खानने म्हटले आहे की, केआरकेने ‘राधे’ चा रिव्ह्यू केला म्हणून नव्हे तर सलमानविरोधात वादग्रस्त वक्तव्य आणि बीईंग ह्युमन संस्थेला फ्रॉड म्हटल्यामुळं त्याच्याविरोधात केस केली आहे. मी केआरकेला चित्रपट समीक्षक मानत नाही.
जर तुम्ही समीक्षक असाल तर चित्रपटाला नापसंती दर्शवण्याचा आपल्याला अधिकार आहे मात्र आपल्याला कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. मी मित्रत्वाच्या नात्यानं त्याला सुधारण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो सुधरला नाही.
Will end Salman’s career and bring him on the streets, threatens Kamal R Khan
महत्त्वाच्या बातम्या
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल
- पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी