वृत्तसंस्था
बीजिंग : जगाला डोकेदुखी बनलेला कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाल्यानंतर आता वन्य आणि समुद्रजीवामुळे नव्या विषाणूचा संसर्ग पसरण्याची धास्ती पसरली आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढला आहे.Wildlife threatens to spread new viruses in China, 18 seafood crisis
चिनमध्ये कोणत्याही जीवाला मारून खाण्याची पद्धत आहे. १२ प्रकारचे प्राणी मारून खाल्ले जातात. त्याचा मोठा व्यापार आहे. जवळजवळ ७१ प्रकारचे विषाणू सस्तन प्राण्यामध्ये असतात. १८ समुद्र प्राण्यामध्ये असलेले विषाणू हे मनुष्य आणि पाळीव प्राण्यांसाठी अधिक धोकादायक आहेत.
वन्यप्राणी यांच्या मासांची विक्री धडाक्यात सुरु आहे. एकेदिवशी हेच मांस चिनी लोकांच्या मुळावर येण्याचा धोका आहे. कारण मनुष्य आणि प्राणी यांच्यात एकेदिवशी अपघाताने विषाणूंचे संक्रमण होईल. त्यांनतर परिस्थिती आटोक्यात येण्यास बराच काळ जाईल. प्राणी- मनुष्य-प्राणी, अशा पद्धतीने विषाणूच चक्र सुरु राहिले तर त्याला आवर घालणे अशक्यप्राय होणार आहे.
चीन सुधारणार नाही
कोरोनापासून कोण धडाच घेत नाही, असे दिसते. समोर धोका असूनही काळजी घ्यायची नाही, असा चंग मनुष्याने बांधला आहे. एकदा मोठा फटका बसल्यानंतर मनुष्य विशेषतः चीन सुधारत नाही आहे, असेच वरील गोष्टीवरून दिसते
Wildlife threatens to spread new viruses in China, 18 seafood crisis
महत्त्वाच्या बातम्या
- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या नातीचा आदर्श, लग्नाचा खर्च टाळून ह्रदयरोगी मुलांसाठी ५० लाख रुपये
- वक्फ बोर्डाचे सदस्य म्हणतात दफन नाही दहन करा, मृत्यूपत्रात केली पार्थिवावर अग्निसंस्काराची इच्छा व्यक्त
- आधी जेलचे जेवण खा, त्यानंतर विचार करू, न्यायालयाने अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली
- कंगणाचा आता फाळणीवरून कॉंग्रेसवर निशाणा, ज्यांचे प्राण गेले त्यांच्या हत्याकांडासाठी ब्रिटिश किंवा कॉँग्रेसला जबाबदार धरण्यात आले का?