• Download App
    विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह|WikiLeaks founder Julian Assange marries Stella Morris in London jail

    विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह

    विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे आणि त्यांची वाग्दत्त वधू स्टेला मॉरिस यांचे बुधवारी लंडनच्या उच्च सुरक्षा असलेल्या बेलमार्श तुरुंगात लग्न झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, असांजे आणि स्टेला यांच्या लग्नाला फक्त चार पाहुणे, दोन अधिकृत साक्षीदार आणि दोन रक्षक उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव येथे मीडियाला परवानगी नव्हती.WikiLeaks founder Julian Assange marries Stella Morris in London jail


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे आणि त्यांची वाग्दत्त वधू स्टेला मॉरिस यांचे बुधवारी लंडनच्या उच्च सुरक्षा असलेल्या बेलमार्श तुरुंगात लग्न झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, असांजे आणि स्टेला यांच्या लग्नाला फक्त चार पाहुणे, दोन अधिकृत साक्षीदार आणि दोन रक्षक उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव येथे मीडियाला परवानगी नव्हती.

    50 वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक असांजे 2019 पासून बेलमार्श तुरुंगात आहेत. याआधी त्यांना लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात 7 वर्षे ठेवण्यात आले होते. असांजे यांनी 2011 मध्ये मॉरिसला त्यांच्या लीगल टीममध्ये सामील केले होते. 2015 मध्ये दोघांमध्ये जवळीकता वाढली. लंडनमधील दूतावासात असताना मॉरिसने असांजे यांच्या दोन मुलांना जन्म दिला.



    असांजे यांच्यावर एक दशकापूर्वी गुप्त अमेरिकन लष्करी दस्तऐवज प्रकाशित केल्याबद्दल हेरगिरीचा आरोप आहे. स्वीडनच्या विनंतीवरून असांजे यांना 2010 मध्ये लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. दोन महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत स्वीडनला असांजे यांची चौकशी करायची होती.

    WikiLeaks founder Julian Assange marries Stella Morris in London jail

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!