वृत्तसंस्था
इम्फाळ : केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आज देशभर रेल रोको आंदोलन करत असताना मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार कायदा करून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी का देत नाही?, असा खोचक सवाल केला आहे/ जोपर्यंत केंद्रसरकार कायद्याद्वारे एमएसपीची गॅरंटी देत नाही तोपर्यंत आंदोलक शेतकरी शांत होणार नाहीत, असा इशारा देखील सत्यपाल सिंग यांनी दिला आहे. Why the central government does not give MSP guarantee to farmers by law? Meghalaya Governor Satyapal Singh’s sharp question
राज्यपाल पदासारख्या घटनात्मक पदावर असताना सत्यपाल सिंग यांनी केंद्र सरकारला अशा पद्धतीचा सल्ला दिल्याने त्याची राजकीय वर्तुळात वेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. एक प्रकारे राज्यपाल या घटनात्मक पदावर राहून सत्यपाल सिंग हे राजकीय वादग्रस्त बाबीवर मत व्यक्त करत आहेत ह हा औचित्यभंग नाही का?, अशी चर्चा आहे. केंद्र सरकारकडून याबाबत नेमकी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे संयुक्तिक किसान मोर्चाचे शेतकरी उत्तर भारतात ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन करत आहेत. उत्तर भारतातल्या बहुतेक रेल्वे स्टेशन्सच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे गाड्या अडवून धरल्या आहेत. कोणत्या स्टेशनवर आम्ही आंदोलन करणार आहोत याच्या सूचना प्रवाशांना देण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलन प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाहीत, अशी ग्वाही संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.
Why the central government does not give MSP guarantee to farmers by law? Meghalaya Governor Satyapal Singh’s sharp question
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : ड्रग्जप्रकरणी असदुद्दीन ओवैसी म्हणतात- ज्यांचा बाप ताकदवान त्यांच्यासाठी आवाज उठवणार नाही!
- अंतराळात चित्रपटाच्या शूटिंगचा विक्रम रशियाच्या नावावर, 40 मिनिटांच्या सीनसाठी लागले 12 दिवस, क्रू सुखरूप पृथ्वीवर परतला
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
- एम्सच्या विद्यार्थ्यांचे राम-सीतेवर वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यास मागितली माफी