नितीश कुमारांवर साधला निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले
विशेष प्रतिनिधी
दरभंगा : जनसुराज यात्रेचे संयोजक प्रशांत किशोर ठिकठिकाणी आपली पदयात्रा काढत आहेत. ते मतदानाबाबत जनजागृती करत आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय पक्षांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी लालू यादव आणि नितीशकुमार यांना सर्वाधिक लक्ष्य केले आहे.Why Muslims of Bihar vote only RJD Prashant Kishor said resaon
याच क्रमाने दरभंगा येथील एका गावात जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्यांनी उपस्थित लोकांना सांगितले की, बिहारचे मुस्लिम फक्त आरजेडीलाच मतदान का करतात? यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. यानंतर त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली.
प्रशांत किशोर म्हणाले की, एससी-एसटीनंतर मुस्लिमांची अवस्था सर्वात वाईट आहे. वास्तविक मुस्लिमांचे म्हणणे आहे की ते मेले तरी भाजपला मतदान करू शकत नाहीत. भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे. तर मग, बिहारमध्ये कोण उरले?
प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारमध्ये दोनच पक्ष आहेत. एक मोदींचा भाजप आणि दुसरा लालूंचा ‘कंदील’. नितीश कुमार किती वेळ कंदील धरून लटकतील आणि कमळाच्या फुलावर कधी उडी मारून बसतील, हेही त्यांना माहीत नाही. तर हे सर्व मुस्लिम लोक म्हणतात की ते जगले किंवा मेले, तरी ते भाजपला मतदान करू शकत नाहीत, म्हणून ते कंदीललाच मतदान करतात.
प्रशांत किशोर यांनीही काल आपला आवडता पक्ष कोणता असल्याचे सांगितले होते. त्यांनी आपला कल काँग्रेस पक्षाकडे व्यक्त केला होता. काँग्रेसकडून ऑफर आल्यास मी चर्चेला तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Why Muslims of Bihar vote only RJD Prashant Kishor said resaon
महत्वाच्या बातम्या
- 24 जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडणार, मराठा समाजाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
- DMK नेत्याची हिंदी भाषकांविरुद्ध गरळ; उत्तर प्रदेश, बिहार मधले लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात!!
- सगळेच प्रभारी बदलून काँग्रेसने टाकली “कात” की प्रियांकांना करून दिला “एस्केप रूट”??
- अखनूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; जवानांनी एका घुसखोर दहशतवाद्याला केलं ठारं, तिघांनी काढला पळ