राहुल गांधी ज्यांना लोको पायलट म्हणत आहेत ते किरायाने आणलेले लोक असल्याचा दावाही भाजपने केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा रेल्वे लोको पायलटसोबत भेटीचा व्हिडिओ आता वादात सापडला आहे. शुक्रवारी (05 जुलै) राहुल गांधी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेले. त्यानंतर काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि दावा केला की राहुल गांधी तिथल्या लोको पायलटना भेटले होते.Why is Rahul Gandhis meeting with the loco pilot controversial The truth of the video came out the railway also reacted
आता उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी राहुल गांधी ज्यांना भेटले ते आमच्या लॉबीतील नव्हते, असे म्हटले आहे. म्हणजे ते बाहेरचे होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये राजधानी ट्रेन चालकाने म्हटले आहे की राहुल गांधी ज्या लोकांना भेटले आहेत ते रेल्वेत काम करत नाहीत. राहुल गांधी ज्यांना लोको पायलट म्हणत आहेत ते किरायाने आणलेले लोक असल्याचा दावाही भाजपने केला आहे.
काँग्रेसने राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत लोको पायलटची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकल्या. लोको पायलट यांच्या खांद्यावर रेल्वे सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यांचे प्रश्न सोडवूनच आपण सुरक्षित रेल्वेचे उद्दिष्ट साध्य करू शकतो.
दुसऱ्या पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर लोको पायलटची भेट घेतली. हे लोको पायलट रेल्वेचा कणा आहेत ज्यांना देशाची जीवनरेखा म्हटले जाते. त्यांचे जीवन सुलभ आणि सुरक्षित करणे हे रेल्वे सुरक्षेच्या दिशेने एक मजबूत पाऊल असेल.
लोको पायलटना भेटण्यासाठी राहुल गांधींनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर, उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) दीपक कुमार म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने रेल्वे स्थानकावर ज्या क्रू मेंबर्सशी चर्चा केली ते त्यांचे लॉबीचे नव्हते, परंतु ते बाहेरचे असू शकतात.
Why is Rahul Gandhis meeting with the loco pilot controversial The truth of the video came out the railway also reacted
महत्वाच्या बातम्या
- भाजपकडून 24 राज्यांमध्ये नवे प्रभारी, भाजपने तावडेंवर दिली बिहारची जबाबदारी, तर जावडेकरांकडे केरळ
- महाराष्ट्रात 2.25 लाख कोटींची होणार गुंतवणूक : अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तरात अजित पवारांचा दावा
- हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेतील मुख्य आरोपी मधुकरचा ठिकाणा सापडला!
- शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! सन्मान निधीची रक्कम दुप्पट होणार?