वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर मोठा आरोप केला आहे. येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना प्रियांका गांधी यांची एक पेंटिंग विकत घेण्यास भाग पाडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे भ्रष्टाचाराचे मॉडेल बाहेर आल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. एफएटीएफच्या अहवालावर गांधी कुटुंब गप्प का? असा सवालही त्यांनी केला.Why Gandhi family silent on FATF report? 2 Crore painting bought, Anurag Thakur’s question to Priyanka Gandhi – Who is R?
अनुराग ठाकूर यांनी प्रियांका गांधींना विचारले की, पेंटिंग विकण्याची काय गरज होती आणि त्यातून आलेले 2 कोटी कुठे वापरले गेले? या खरेदी व्यवहारातील ‘R’ कोण आहे? पद्मभूषण पुरस्कारासाठी पेटिंग होते का? असे आणखी किती पुरस्कार आणि चित्रे विकून पैसे उभे केले गेले? ते म्हणाले, काँग्रेसने देश विकण्याची एकही संधी सोडली नव्हती.
ज्या पेंटिंगवर भाजप काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, ते चित्र एमएफ हुसैन यांनी काढलेले होते. येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी प्रियांका गांधींकडून कॅनव्हासवर बनवलेली राजीव गांधींची प्रतिमा असलेले हे पेंटिंग 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
राणा कपूर यांचा मोठा दावा
रिपोर्ट्सनुसार, राणा कपूर यांनी ईडीसमोर या पेंटिंगबाबत मोठा दावा केला होता. हे पेंटिंग विकत घ्यायला भाग पाडले गेल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच या पेंटिंगच्या बदल्यात दिलेले 2 कोटी रुपये सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने आरोपपत्र दाखल केले होते.
त्यात हे उघड झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणा यांनी त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या मंत्र्यांची नावेही सांगितली. ते म्हणाले होते की, तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी त्यांना सांगितले होते की, जर त्यांनी पेंटिंग विकत घेतली नाही, तर गांधी कुटुंबाशी संबंध निर्माण करण्यात अडचण येईल.
यानंतर, मुरली देवरा यांचे सुपुत्र मिलिंद देवरा 1 मे 2010 रोजी राणा कपूर यांना पत्र लिहितात. या पत्रात ते राणा कपूर यांना अंकल म्हणून संबोधतात आणि हे पेंटिंग विकत घेणे योग्य असल्याचे आश्वासन देतात.
मिळालेल्या माहितीनुसार, ते वारंवार त्यांना पेंटिंग विकत घेण्यास सांगत होते. माहितीनुसार, राणा यांनी ईडीला असेही सांगितले की, अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले होते की, जर त्यांनी गांधी कुटुंबाला मदत केली तर ते त्यांना पद्मभूषण देण्याचा विचार करू शकतात.
Why Gandhi family silent on FATF report? 2 Crore painting bought, Anurag Thakur’s question to Priyanka Gandhi – Who is R?
महत्वाच्या बातम्या
- अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडून मुलाचा मृत्यू : खेळता-खेळता 15 फूट खाली पडला 5 वर्षीय मुलगा; उपचारादरम्यान मृत्यू
- जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचा संप, काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
- अलाहाबाद कोर्ट परिसरातील मशीद हटवा, अन्यथा ध्वस्त करू; सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला हायकोर्टाचा निकाल
- काँग्रेसच्या तब्बल चार मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रमुख राहिलेले संघ प्रचारक श्रीपाद सहस्त्रभोजने कालवश!!