• Download App
    चार वेळच्या सीएम मायावती यंदा गप्प गप्प का? मायावतींच्या मौनाचा फायदा अखिलेश की योगींना..?Why four time CM Mayamati remains silent & reclutant campaigner?

    WATCH : चार वेळच्या सीएम मायावती यंदा गप्प गप्प का? मायावतींच्या मौनाचा फायदा अखिलेश की योगींना..?

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ / नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची रणधुमाळी योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेशसिंह यादव यांच्याभोवती वेगाने केंद्रित होत असताना देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याच्या चार वेळेला मुख्यमंत्री बनलेल्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती मात्र एकदम शांत शांत, गप्प गप्प आहेत… हे कोडे राजकीय वर्तुळाला कोड्यात टाकणारे आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन लाखमोलाचा प्रश्न असा आहे, की मायावतींच्या या मौनाचा फायदा कोणाला होईल बरे?Why four time CM Mayamati remains silent & reclutant campaigner?

    ज्यांच्याशिवाय यूपीचे राजकारण गेली अडीच-तीन दशके पूर्णच होऊ शकले नसते, अशा मायावती २०२२च्या विधानसभा रणधुमाळीमधून जवळपास अलिप्तच आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ एक आठवडा राहिला असेपर्यंत त्या पडद्याआडच राहिल्या. त्यांनी आपली पहिली सभा २ फेब्रुवारीला गाझियाबादमध्ये घेतली. मायावतींच्या या मौनाची कारणे आणि त्याचे परिणाम याबाबत तीव्र कुतुहल आहे.

    राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, मायावतींच्या या मौनाची प्रमुख तीन कारणे आहेत. एक म्हणजे, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात त्या चांगल्याच अडकल्यात आणि त्यामुळे भाजपला अंगावर घेण्यास त्या कचरत आहेत. दुसरे कारण, त्यांचे प्रकृती अस्वास्थ. २०१९मधील लोकसभा निवडणुकीत भलामोठा भोपळा मिळाल्यानंतर राजकीय रंगमंचावरून त्यांनी जवळपास एक्झिटच घेतली होती. जिव्हारी लागलेला पराभव, सत्तेत नसल्याने गेल्या दहा वर्षांत झालेले पक्षाचे खच्चीकरण आणि बिघडत चाललेले स्वास्थ अशी ती कारणे आहेत. गाझियाबाद सभेमधील त्यांची बाँडी लॅंग्वेज पाहिली, तर मूळच्या मायावतीची झलक त्यात दिसली नाही. अर्थात अजून बराच कालावधी शिल्लक आहे. त्यात त्या कशा पद्धतीने उतरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

    खरा प्रश्न आहे, तो मायावतींच्या मौनाचा फायदा कोणाला होईल? पाहू या काही समीकरणे :

    •  २०१७ विधानसभा व २०१९लोकसभेतील मतदान पाहिले तर लक्षात येईल भले जागा किरकोळ मिळाल्या असल्या तरी मायावतींनी अनुक्रमे २२.२३ टक्के व १९.४३ टक्के मते घेतलेली आहेत. याचाच अर्थ असा, की त्यांच्याकडे सरासरी २० टक्क्यांची मतपेढी आहे. पण ही मतपेढी शाबूत राहील का? आणि जर राहिली नाही तर ती कोणाकडे जाईल?
    •  दलितांमधील जाटव समाज मायावतींच्या खच्चून मागे आहे, पण बिगर जाटव दलित आता भाजपकडे वळलेले दिसताहेत. जमिनीवर अखिलेश यांचा यादव समाज आणि दलित यांच्यातील संघर्ष कायमच आहे. त्यामुळे मायावतींना जर मत द्यायचे नसेल तर जाटवदेखील भाजपकडे खेचले जातील का? तसे घडलेच तर भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जाईल.

    •  स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम यूपीत मायावतींनी मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार दिले आहेत. हे उमेदवार तगडे आहेत. जाटव व मुस्लिम अशा समीकरणाने ते पश्चिम यूपीमध्ये अखिलेश व राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांना धक्का बसू शकतो. भाजपला नेमके तेच हवे आहे. कारण शेतकरी आंदोलनामुळे जाट समूह भाजपपासून तुटताना दिसतो आहे. त्यामुळे पश्चिम यूपीत मायावतींनी मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट करावी, असे भाजपचे मांडे आहे.

    Why four time CM Mayamati remains silent & reclutant campaigner?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य