• Download App
    संघ मुसलमानांना का घाबरतो?, मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकतेची बात करतात; असदुद्दीन ओवैसींचा दावा Why does the Sangh fear Muslims?, Muslims only talk about equality and equal citizenship; Asaduddin Owaisi's claim

    संघ मुसलमानांना का घाबरतो?, मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकतेची बात करतात; असदुद्दीन ओवैसींचा दावा

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात हिंदुत्व दृढमूल झाल्याची झाल्याचा विश्वास व्यक्त केला असताना मुस्लिमांनी आपण या देशाचे राज्यकर्ते होतो, अशी वर्चस्ववादी भावना सोडून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. डॉ. भागवतांच्या या अपेक्षेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. Why does the Sangh fear Muslims?, Muslims only talk about equality and equal citizenship; Asaduddin Owaisi’s claim

    हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी डॉ. मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. संघ मुसलमानांना एवढा का घाबरतो?? संघाला भारतातील बहुलतावादाची एवढी का भीती वाटते??, असे सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहेत. मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकता याचीच बात करतात. वर्चस्वाची नाही. पण संघासाठी देशाची विविधता राष्ट्रविरोधी आहे. ते लोकांना मुसलमानांच्या विरोधात हिंसा भडकवायला चिथावणी देतात, असा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

    डॉ. मोहन भागवत यांची मुलाखत पांचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे देशात हिंदुत्व संकल्पना राजकीय दृष्ट्या दृढमूल होत आहे. हिंदू ही या देशाची ओळख आहे. हिंदूंना 1000 वर्ष संघर्ष करावा लागला आहे. परंतु, आता हिंदूंमध्ये जागृती आली आहे. अर्थात यामुळे देशात इस्लामला धोका नाही. त्यासाठी मुसलमानांना आपलाच धर्म बरोबर ही भावना सोडावी लागेल. आपण या देशातले राज्यकर्ते होतो, ही भावना दूर ठेवावी लागेल, अशी अपेक्षा डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.

    या अपेक्षेवरच असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेऊन मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकता यांचीच बात करतात. सर्वोच्चतेची वर्चस्वाची बात ते करत नाहीत, असा दावा केला आहे.

    Why does the Sangh fear Muslims?, Muslims only talk about equality and equal citizenship; Asaduddin Owaisi’s claim

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त