विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना ज्या आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे त्यांना अद्याप अटक का केली नाही? असा सवाल केला.Why didn’t arrest peoples in Lakhimpur case
सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ म्हणाले की, ‘‘ राज्य सरकार नेमका काय संदेश देऊ पाहात आहे. याप्रकरणातील पुरावे आणि अन्य बाबी नष्ट करण्यात आलेल्या नाहीत ना याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घ्या.
अन्य आरोपींना देखील तुम्ही अशीच वागणूक द्याल का? असा सवाल करतानाच न्यायालयाने हे आरोप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. आता याप्रकरणाची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होईल.
या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने केलेल्या चुकीच्या ट्विटला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित वृत्तवाहिनीच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येवू शकते
पण न्यायालयानेच त्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.सरन्यायाधीश हे उदार असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. असेही न्यायालयाने नमूद केले.
Why didn’t arrest peoples in Lakhimpur case
महत्त्वाच्या बातम्या
- सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
- ब्रिटनमध्ये भारतीय प्रवाशांची क्वारंटाइनची कटकट मिटली, भारत आणि ब्रिटनदरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी सहमती, दोन्ही देशांच्या नियमांत बदल
- Cruise Drugs Case : यामुळे फेटाळला आर्यन खानचा जामीन; जेथे कसाब, सलेम आणि संजय दत्तने भोगली शिक्षा त्याच कारागृहात आर्यनची रवानगी
- मोठी बातमी : केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा राजीनामा, म्हणाले- राष्ट्राची सेवा करणे परमसौभाग्य, पुन्हा शिक्षण जगतात परतणार