• Download App
    दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून गायब का झाल्या ? राज्यसभेमध्ये केंद्र सरकारचे उत्तर । Why did two thousand rupee notes disappear from the market? Central Government's reply in Rajya Sabha

    दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून गायब का झाल्या ? राज्यसभेमध्ये केंद्र सरकारचे उत्तर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या वर्षांपासून बाजारातून २ हजार रुपयांच्या नव्या नोटा गायब झाल्या आहेत.याबाबत राज्यसभेत मोदी सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. Why did two thousand rupee notes disappear from the market? Central Government’s reply in Rajya Sabha

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आणली. यानंतर २००० आणि पाचशेच्या नव्या नोटा बाजारात आल्या आहेत. परंतु मागील वर्षांपासून बाजारात २००० हजार रुपयांच्या नोटा गायब होत चालल्या आहेत. हल्ली चलनातही २००० हजार रुपयांच्या नोटा जास्त नाहीत. यावरुन केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली.

    देशातील बाजारात नोव्हेंबरमध्ये नोटांची संख्या मोठी घटली आहे. बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या २२३.३ कोटींवर आहे. एकूण नोटांच्या मुल्यापैकी हा आकडा १.७५ टक्के आहे. २०१८ मध्ये केंद्र सरकारने २ हजार रुपयांच्या एकूण ३३६.३ कोटी नोटा चलनात आणल्या होत्या. परंतु आता या नोटा चलनात कमी आहेत. यावर अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या नोटांबाबत लिखीत उत्तर दिलं आहे.



    अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलं आहे की, एका मुल्याच्या नोटा छपाईचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानेच घेतला जातो. नोटबंदीनंतर ३१ मार्च २०१८ पर्यंत बाजारात आणि चलनात २ हजार रुपयांच्या एकूण ३३६.४ कोटी नोटा होत्या. मात्र २०१८ नंतर या नोटा छपाई करण्यासाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन ऑर्डर दिली गेली नाही. २०१८-१९ पासून नवीन २००० रुपयाच्या नोटा छापण्यासाठी नवीन इंडेंट ठेवला गेला नाही यामुळे बाजारात नव्या नोटा उपलब्ध नाहीत. तसेच बाजारात ज्या जुन्या २ हजार रुपयाच्या नोटा होत्या त्या गहाळ आणि खराब झाल्यावर त्यांना चलनातून बाद झाल्या. यामुळे सध्या बाजारात आणि चलनात २ हजार रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात नाहीत, असे पंकज चौधरी यांनी सांगितले आहे.

    Why did two thousand rupee notes disappear from the market? Central Government’s reply in Rajya Sabha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य