वृत्तसंस्था
दौसा (राजस्थान) : काँग्रेसच्या केंद्र सरकारने आणि विविध सीमावर्ती राज्यांमधल्या सरकारांनी आत्तापर्यंत सीमेवरील गावांचा आणि शहरांचा विकास का केला नाही?, असा खोचक सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे धक्कादायक कारण सांगितले.Why did the Congress governments not develop the border villages? modi
राजस्थान मधील दौसा येथे जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी सीमेवरील गावांचा आणि शहरांचा विकास हा आपल्या सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे आवर्जून नमूद केले. पण त्याचवेळी त्यांनी काँग्रेस सरकारने याआधी सीमेवरील गावे आणि शहरांचा विकास का केला नाही?, हेही स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारांनी सीमेवरच्या गावांचा आणि शहरांचा विकास केला नाही, कारण काँग्रेस घाबरत होती की शत्रू आपण बनवलेल्या रस्त्यावरून देशात घुसेल. काँग्रेसने भारतीय जवानांच्या शौर्य आणि बहादुरीला नेहमीच कमी लेखले. पण आपल्या जवानांची अशी हिंमत आहे की जे शत्रूला आपल्या देशातून उखडून फेकतील. भारतीय जवान आणि भारतीय सैन्य दल यांचे देशाच्या सीमा रक्षणाची क्षमता फार अफाट आहे. त्यांच्यावर आपला विश्वास आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
काँग्रेसने केवळ सीमेवरील गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असे नाही, तर त्यांनी समाजातले अनेक घटक देखील विकासाच्या अनेक संधींपासून वंचित ठेवले. व्होट बँकेचे राजकारण करताना विशिष्ट घराणी, विशिष्ट गट विशिष्ट समुदाय यांचाच विकास साधण्याचे नाटक त्यांनी केले. त्यामुळे देशातला फार मोठा घटक विकासापासून दूर राहिला. हा सर्व घटक आपण विकासाच्या धारेत जोडून घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
Why did the Congress governments not develop the border villages? modi
महत्वाच्या बातम्या
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे 14 एप्रिलला उद्घाटन
- रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल; छत्तीसगडचे दिग्गज नेते, रायपूरचे सलग सहावेळा खासदार ते केंद्रीय मंत्री!!
- अल निनोमुळे भारताच्या मान्सूनवर संकट : या वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, अमेरिकेच्या हवामान खात्याने दिला इशारा
- पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी SIT गठीत होणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
- तुर्कस्तान-सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 29 हजारांच्या पुढे, संयुक्त राष्ट्राने वर्तवला 50,000 मृत्यूंचा अंदाज