• Download App
    प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणात काँग्रेस सरकारने वेळीच का कारवाई केली नाही??; अमित शहांचा सवालWhy did the Congress government not take timely action in Prajwal Revanna obscene video case?

    प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणात काँग्रेस सरकारने वेळीच का कारवाई केली नाही??; अमित शहांचा सवाल

    वृत्तसंस्था

    बेंगलोर : कर्नाटक मधल्या JD(S) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणावर भाजप – जेडीएस युतीला काँग्रेसने घेरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रियांका गांधी आणि कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारला उलट सवाल करून कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेसलाच घेरले. Why did the Congress government not take timely action in Prajwal Revanna obscene video case?

    प्रज्वल रेवण्णा प्रकरणाचे व्हिडिओ आधीच हातात असताना काँग्रेस सरकारने कठोर कारवाई का केली नाही??, कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारच्या हातातला विषय असताना राज्य सरकारने याकडे का दुर्लक्ष केले??, असे सवाल अमित शाहांनी केले त्याचवेळी भाजप मातृशक्ती बरोबर असल्याची ग्वाही त्यांनी दिली

    अमित शाह म्हणाले, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात भाजपची भूमिका स्पष्ट आहे की, आम्ही देशाच्या मातृशक्तीच्या सोबत उभे आहोत. मातृशक्तीवर होणारे अत्याचार किंवा त्यांचा अपमान भाजप सहन करणार नाही. पण मला प्रियांका गांधी आणि काँग्रेसला विचारायचे आहे की, कर्नाटकात कोणाचे सरकार आहे?? सरकार काँग्रेस पक्षाचे आहे. त्यांनी आजपर्यंत यावर कारवाई का केली नाही?? कारण हा राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, यावर राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे. प्रियांका गांधींनी भाजपवर प्रश्नचिन्ह लावण्यापेक्षा तिथल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत.

    रेवण्णा प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे. भाजप या तपासाच्या बाजूनेच आहे आणि आमच्या भागीदार JD(S) ने देखील यावर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. आज त्यांच्या कोअर कमिटीची बैठक आहे. ते प्रज्वल रेवण्णा यांच्यावर उचित कारवाई करतील, अशी पुस्ती अमित शाह यांनी जोडली.

    Why did the Congress government not take timely action in Prajwal Revanna obscene video case?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील

    Icon News Hub