अदर पूनावाला तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात अशी टीका करत सरकारने महामारी अधिनियमांतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी अधिग्रहित करावी अशी मागणी गोरखपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राधा मोहनदास अग्रवाल यांनी केली आहे.Why did the BJP MLA say, you are worse than a robber, Adar Poonawala
विशेष प्रतिनिधी
लखनौ : अदर पूनावाला तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात अशी टीका करत सरकारने महामारी अधिनियमांतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी अधिग्रहित करावी अशी मागणी गोरखपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राधा मोहनदास अग्रवाल यांनी केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने नुकतीच कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केली आहे. राज्य सरकारला ही लस चारशे रुपयाला तर खासगी रुग्णालयांना सहाशे रुपयांना मिळणार आहे. या किंमतीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अग्रवाल यांनी बुधवारी एक ट्विट करत म्हटले आहे, की अदर पूनावाला तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात. पंतप्रधान कार्यालय, अमित शाह, बीएल संतोष, डॉ.हर्षवर्धन यांनी तुमच्या फॅक्टरीचे अॅपिडेमिक अॅक्ट अंतर्गत अधिग्रहण करायला हवे.
अग्रवाल यांनी म्हटले आहे की, अअदर पूनावाला यांची कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निमार्ता कंपनी आहे. या कंपनीने बुधवारी खासगी रुग्णालयांना 600 रुपये प्रती डोस आणि राज्य सरकारांना 400 रुपये प्रती डोस दराने लस विकण्याची घोषणा केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या भारत सरकारला दीडशे रुपयाला लस देत आहेत. यावर अदर पूनावाला एका टीव्ही चॅनेलशी बोलताना म्हटले होते की, इतक्या कमी किंमतीत लस विकून आम्हाला तोटा होत नाही पण अगदीच कमी फायदा होत आहे.
सुपरफायदा म्हणतात तो होत नाही. आता जवळपास तीनशे पट अधिक किंमतीने लस विकून तुम्ही फायदा कमाविणार का? असा सवाल अदर पूनावाला यांना केला जात आहे.