• Download App
    महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख का? Why date on the power struggle in Maharashtra

    महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख का?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख पडली आहे. शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले असले तरी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचा निर्णय आता 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सरकार पडण्याची दिलेली तारीख उलटून जाणार आहे. Why date on the power struggle in Maharashtra

    महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच कसा सुटणार याचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. हे घटनापीठ 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेणार आहे. 14 फेब्रुवारी नंतर तारीख पे तारीख पडणार नसल्याची ठाकरे गटाला अपेक्षा आहे.

    न्यायालयात नेमके काय घडले?

    मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाची गरज का आहे हे न्यायालयाला सांगितले. नबाम रेबिया खटल्याचा दाखल त्यांनी दिला. त्यावर कोर्टाने जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याबाबतची सुनावणी घेण्याची अनुमती दर्शवली.

    मात्र, महाधिवक्त्यांनी 14 फेब्रुवारीनंतर ही सुनावणी घेता येईल का?, अशी विचारणा केली. त्यावर कपिल सिब्बल यांच्या म्हणण्याप्रमाणे 14 फेब्रुवारी हा अतिशय शुभ दिवस आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांना इथे न थांबता घरी असायला हवे, असे न्यायमूर्ती शाह म्हणाले.



    त्यावर सरन्यायाधीशांनी आपण 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी करू शकतो, त्यानंतर आसामचे प्रकरण सुनावणीला घेऊ असे सांगितले. यावर मग शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी ठाकरे गटाचा मुद्दा कितपत टिकतो?, हे पाहायला हवे असे नमूद केले.

    त्यानंतर सरन्यायाधीशांनी आपण 14 फेब्रुवारीला सुनावणी घेऊ असे सांगत  सुनावणीची पुढची तारीख जाहीर केली.

    शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. पण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात ठेवल्याने संजय राऊत यांनी सरकार पडण्याची दिलेली तारीख टळली आहे.

    Why date on the power struggle in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!